Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; असा आहे हवामान विभागाचा अंदाज
Weather Forecast Updates in Marathi : महाराष्ट्रात सध्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. आज (11 जुलै) मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुसळधार पावसाने शेतीना कामांना वेग तर, काही ठिकाणी प्रचंड नुकसान
Maharashtra, Mumbai Weather Forecast Latest News : महाराष्ट्रात सध्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. काही भागात मुसळधार तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. सोमवारी (8 जुलै) मुंबईसह बऱ्याच ठिकाणी पावसाने झोडपून काढले. यानंतर आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ADVERTISEMENT
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी (10 जुलै) संध्याकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. मुंबईतील परळ, वरळी, भायखळा परिसरात मुसळधार पाऊस बरसत होता. तसंच, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आज (11 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा : Kalyan Suicide: 'तुझे ओठ काळे, तुझ्या तोंडातून वास येतो', पती-सासूच्या टोमणे; विवाहितेची आत्महत्या
भारतीय हवामान विभागाने 10 जुलै रोजी महाराष्ट्रातील हवामान कसे असेल, याबद्दलचा अंदाज वर्तवला असून, मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Mumbai Weather Update: मुंबई, महाराष्ट्रातील पावसाचा नेमका अंदाज, पुढील 24 तासात कुठे-कुठे बरसणार?
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा : Vidhan Parishad Election: कोणाचे आमदार कुठल्या हॉटेलमध्ये, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
मुसळधार पावसाने शेतीना कामांना वेग तर, काही ठिकाणी प्रचंड नुकसान
कोकणात आता पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे. त्यामुळे भात शेतीच्या लावणीची कामे भराभर उरकण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. शेतकरी अजूनही चांगल्या पावसाची वाट बघत आहे. त्याचप्रमाणे जर दुसरीकडे बघायचं झालं तर, काही असेही जिल्हे आहेत जिथे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड शेती नुकसान झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT