Viral Video: मुंबईच्या AC ट्रेनमध्ये खळबळ! नग्न अवस्थेत असलेला पुरुष चढला महिलांच्या डब्ब्यात, महिलांनी आरडाओरडा करताच...
Mumbai Local Train Viral Video: सीएसटीहून कल्याणला निघालेली एसी ट्रेन सोमवारी घाटकोपर स्टेशनला दुपारी चार वाजताच्या सुमारास पोहोचली, त्याचदरम्यान एक पुरुष नग्नअवस्थेत महिल्यांच्या कोचमध्ये चढला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सीएसटी-कल्याण एसी ट्रेनमध्ये घडला खळबळजनक प्रकार
Mumbai Local Train Viral Video: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानका खळबळ उडवून देणारी घटना घडली. सीएसटीहून कल्याणला निघालेली एसी ट्रेन सोमवारी घाटकोपर स्टेशनला दुपारी चार वाजताच्या सुमारास पोहोचली, त्याचदरम्यान एक पुरुष नग्नअवस्थेत महिल्यांच्या कोचमध्ये चढला. त्यानंतर महिलांनी प्रचंड आरडाओरडा केला आणि महिलांच्या डब्ब्यात असलेल्या टीसीला या धक्कादायक प्रकाराबाबत कळवलं. त्यानंतर टीसीने नग्न अवस्थेत महिलांच्या कोचमध्ये घुसलेल्या पुरुषाला बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे प्रवासी संघटनेनं या प्रकरणाची दखल घेतली आहे. याप्रकरणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT
रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे काय म्हणाल्या?
"काल (सोमवारी) 4.10 ला सीएसटीकडून कल्याणकडे जाणारी एसी ट्रेन घाटकोपर स्टेशनला पोहोचल्यावर काही प्रवासी खाली उतरले. त्यानंतर प्रवाशांसोबत एक पुरुष पूर्ण नग्न अवस्थेत महिलांच्या कोचमध्ये चढला. ते बघून महिला जोरजोरात ओरडायला लागल्या. प्रत्यक्षदर्शींनीच हा व्हिडीओ मला पाठवला आहे. घाटकोपरसारखं स्टेशन जिथे मेट्रो कनेक्ट आहे आणि प्रचंड गर्दीचं स्टेशन आहे, अशा स्टेशनवर नग्न अवस्थेत असलेला पुरुष महिलांच्या डब्ब्यात चढतो आणि महिला ओरडल्या तरीही तो उतरला नाही. मग महिलांनी टीसीला सांगितलं आणि त्यानंतर टीसीने त्याला बाहेर काढलं. ही खूप दुर्देवी घटना आहे. महिला सतर्क होत्या, त्यांनी पटकन आरडाओरडा केला आणि त्यांनी टीसीला बोलावून त्याला खाली उतरवलं.
हे ही वाचा >> 'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… एक फैशन हो गया है', अमित शाहांच्या विधानावरुन तुफान राडा!
ज्यावेळी ट्रेनमध्ये गर्दी नसते, अशावेळी एसीचे दरवाजे बंद झाले असते आणि तो महिलांच्या डब्ब्यात घुसला असता, तर किती मोठी दुर्देवी घटना घडण्याची शक्तता होती. हा विषय खूप गंभीर आहे. याची दखल रेल्वे मंत्री, संबंधीत रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने घ्यायला पाहिजे. कारण महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही घटना गांभीर्याने घ्यायला पाहिजे. प्रत्येत स्टेशनला मुंबई शहरातील उपनगरीय ट्रेन ज्या जात आहेत, अशा स्टेशनवर आरपीएफ, जीरआरपी दिसत नाही. ती कमतरता असेल, तर ते संख्याबळ वाढवणं आणि त्याकडे गांभीर्यानं बघणं राज्य शासनाचं काम आहे. महिलांच्या सुरक्षिततेला तेव्हढच महत्व द्या, जेवढं तुम्ही इतर विषयाला देता, अशी विनंती मी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना करत आहे, अशी प्रतिक्रिया लता अरगडे यांनी दिलीय.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> 18 November 2024 Gold Rate: आरारारा! ग्राहकांसाठी लॉटरीच; सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा झाली मोठी घसरण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT