Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरणात विसर्ग वाढवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसामुळे आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

point

पुण्यात नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना महानगरपालिकेकडून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

point

पुणेकरांना महानगरपालिकेकडून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Rain Alert By PMC : पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसामुळे आज (26 जुलै) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, पुण्यात नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना महानगरपालिकेकडून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Rain Alert Discharge in Khadakwasla dam will increase warning to citizens to be alert by PMC)

खडकवासला धरणाचा मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी 6 वाजता वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे. पुण्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

हेही वाचा : Maharashtra Rain News: मुसळधार पावसामुळे राज्यात कोणत्या 8 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी?

पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने काल (गुरूवार 25 जुलै) उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारा यांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला होता. यावेळी नागरिकांनी त्यांच्या अडणचणी त्यांच्यासमोर मांडल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्याचबरोबर पुणे शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

हेही वाचा : Rain Update: रात्र वैऱ्याची... पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!

हवामान विभागाने आज येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिरूर, भोर, वेल्हा, मावळ मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुळा मुठा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुणेकरांना सावध राहून स्वत:ची काळजी घेण्यात आवाहन करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT