Pune Dumper Accident : पुण्यातील वाघोलीमध्ये मध्यरात्री भीषण अपघात, फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील वाघोलीमध्ये भीषण अपघात

point

मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं

point

डंपरचालक पोलिसांच्या ताब्यात

Pune Wagholi Dumber Accident : फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना आज पुण्यात घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन मुलांचा आणि त्यांच्या काकांचा समावेश आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वाघोली येथील केसनंद फाट्याजवळीत पोलीस ठाण्यासमोर घडली. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार डंपर चालक मद्यधुंद होता असं समजतंय.

ADVERTISEMENT


हे ही वाचा >> Kalyan Dombivali : कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीचा विनयभंग केल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या...

वाघोली फाट्यावर घडलेल्या या घटनेत MH 12 VF 0437 क्रमांकाच्या डंपर चालकाने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडल्याची माहिती आहे. जखमींवर आयनॉक्स रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तर मृतदेह सुद्धा आयनॉक्स रुग्णालयातून ससूनला पाठवण्यात आले आहेत. डंपर चालक गजानन शंकर तोत्रे, (26 वर्ष) हा नांदेडचा असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यालाही उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे. झोन 2चे एसीपी खाडे, एसीपी सोनवणे आणि इतर पोलीस कर्मचारी कर्मचारी दाखल झाले होते. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रजितवाड हे करीत आहेत.

हे ही वाचा >> Sharad Pawar Call Devendra Fadnavis : शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोेलताना म्हणाले...

दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये पुण्यात असे अनेक अपघात घडले असून, पोर्शे कार अपघातानंतर जनतेत मोठा संताप पाहायला मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकामी नियम कडक केल्याचं दिसलं होतं. पण आता पुन्हा रस्त्यांवर असे मद्यधुंद वाहनचालक दिसायला लागल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 



हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT