Mahabaleshwar: महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन् तुम्हीच काय ते ठरवा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन्
महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन्
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाबळेश्वरमधील पर्यटन पॉईंटस काही दिवस बंद करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

point

महाबळेश्वरमध्ये हंगामातील उचांकी 12.99 इंच पावसाची नोंद

point

अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पथक स्थापन

Mahabaleshwar Rain: महाबळेश्वर: सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे निसर्गाचं हेच रुप अनुभवण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे महाबळेश्वरला येत आहे. त्यामुळे अनेक पॉईंट्सवर पर्यटकांची गर्दी होत आहे. मुसळधार पाऊस असल्याने या ठिकाणी  अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता सातारा जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

महाबळेश्वरमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विविध विभागांचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांची गर्दी असणारे महाबळेश्वरमधील सर्वच पॉईंट्स हे काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Mumbai-Pune Weather Update: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत काही पर्यटक जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन करत असल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून जिल्हा प्रशासनाने उपाययोजनेचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का?

याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, 'जिल्ह्याच्या पश्चिम भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.'

हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत पावसाचा प्रचंड धुमाकूळ; लोकल ट्रेनचं काय झालंय?

कोयना धरणात 71 टीएमसी पाणीसाठा

कोयना धरणातून प्रतिसेकंद सरासरी 55,522 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 70.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी हे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मागील 24 तासांत पाणीसाठ्यात 4.79 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मागील चोवीस तासात झालेला पाऊस: 

कोयना - 168 मि.मी
नवजा - 226 मि.मी

ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने ओढे, नदी, नाले हे ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जोर गावाला जोडणाऱ्या तीन साकव पुलावरून पाणी वाहू लागल्याने जोर आणि परिसरातील वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने डोंगर उतारावरून वाहत येणारे पाण्याचे लोंढे रस्त्यावर आल्याने अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT