Jio, Airtel च्या ग्राहकांना मोठा झटका, रिचार्ज प्लॅन 'इतक्या' रूपयांनी महागले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

 relince jio hike price airtel tariff hike full list of recharge plan see new plan list
Reliance Jio,Jio,Bharti Airtel,Airtel tariff hike,Airtel price hike,Airtel plan hike, Airtel hike in price, airtel plan date, airtel effective plan, effective airtel plan in Maharashtra ,
social share
google news

Jio Airtel New Plans List : जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. एअरटेलने आपले प्लॅन्स 600 रुपयांनी महाग केले आहेत, तर जिओच्या प्लॅनच्या किमती 27 टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा फटका बसला असून मोबाईल वापरण आता महाग झाले आहे. (relince jio hike price airtel tariff hike full list of recharge plan see new plan list) 

टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्यानंतर रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली आहे. याआधीही टेलिकॉम कंपन्यांनी काही योजनांमध्ये सुधार केला होता. पण यावेळी संपूर्ण पोर्टफोलिओ बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता रिचार्ज प्लॅनसाठी आता किती पैसे करावे लागतील हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Maharashtra Budget 2024 : 'मत'पेरणी! शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या 'या' मोठ्या घोषणा

'नवीन योजना लॉन्च करणे हे 5G आणि AI तंत्रज्ञानातील गुंतवणुकीद्वारे उद्योगातील नावीन्य आणि वाढीच्या दिशेने एक पाऊल आहे, असे रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले. तसेच कंपनीने त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले होते की, '2GB आणि त्यावरील सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित 5G सेवा उपलब्ध असेल. नवीन योजनांची किंमत 3 जुलै 2024  पासून लागू होईल. हे सर्व टचपॉइंट आणि चॅनेलवरून प्रवेश करण्यायोग्य असतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : विधानसभा निवडणुकीआधी थेट कृषी पंपाचं वीज बीलच माफ!

एअरटेलचे रिचार्ज प्लानही महागले

Jio सोबत Airtel ने देखील आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. भारतात चांगला टेलिकॉम व्यवसाय चालवण्यासाठी कंपनीचा ARPU 300 रुपयांच्या वर असावा. ARPU म्हणजेच सरासरी महसूल म्हणजे वापरकर्ते आणि ग्राहकांकडून मिळणारी सरासरी कमाई, असे एअरटेल कंपनीने म्हटले आहे. तसेच रिचार्जच्या किमती कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. एंट्री लेव्हल प्लॅनच्या किमती प्रतिदिन 70 पैशांपेक्षा कमी वाढल्या आहे, असे कंपनीने सांगितले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT