Pune Drug Case Update : पुणे ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune drug case news update two policemen suspended fc bar sealed shambhuraj desai sushma andhare
विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.
social share
google news

Pune Drug Case News Update : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओनंतर ड्रग्जचं प्रकरण चांगलच तापलं होतं. त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं आहे. या प्रकरणी पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचं निलंबन करण्यात आले आहे. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे.  (pune drug case news update two policemen suspended fc bar sealed shambhuraj desai sushma andhare) 

पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. हॉटेलमधील 5 जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा मद्यसाठा ठेवला होता, त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होत्या. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

हे ही वाचा : Maharashtra Vidhan sabha : भाजप लढवणार 170 जागा? अजित पवार, शिंदेंना किती?

शंभूराजेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा 

पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडतेय. त्याही वेळेला जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे आढळायला लागले, तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले. पण शंभूराज देसाई अरेरावीने बोलतात, त्यांना मला खास प्रश्न विचारायचाय, हप्ता भरपूर मिळाला की आम्ही तरुणांच्या जीवनाशी सुद्धा त्यांना खेळायचे. या सगळ्या प्रकरणांमध्ये शंभूराजे यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय शंभूराजे देसाई यांच्यासाठी फक्त काम करणारे राजपूत यांचं निलंबन झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्याशिवाय पुणे सुधारू शकत नाही. असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Murlidhar Mohol : "मुंडे साहेबांना आज खूप आनंद झाला असता", मोहोळ झाले भावूक

दरम्यान या सर्व प्रकरणावर शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कल्याणीनगर प्रकरणानंतर आम्ही सर्व हॉटेल आणि पब यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यत जवळपास 60 जणांवर कारवाई केली. हा व्हिडिओ कुठल्या भागातील आहे, त्याची आम्ही चौकशी करणार आहे. 49 बार आणि पब बंद केलेली अजून सुरु केलेली नाहीत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, ज्या परिसरातील हॉटेलमध्ये हे घडलेय त्याबाबत कसून चौकशी करण्यात येईल, असेही देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT