Navi Mumbai Car Accident : दोन कारची धडक, एअरबॅग उघडल्या अन् मानेला झटका बसल्यानं चिमुकल्याचा मृत्यू...
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजी आरेठिया हे त्यांचा मुलगा हर्ष आणि दोन पुतण्यांसोबत रात्री 11 वाजता फिरायला गेले होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नवी मुंबईत दोन कारची समोरासमोर धडक

कार अपघातात लहान मुलाचा मृत्यू

सिटबेल्टमुळे कसा गेला चिमुकल्याचा जीव?
प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी कारमध्ये एअरबॅग्ज बसवल्या जातात. पण नवी मुंबईत या एअरबॅगनेच 6 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव घेतला आहे. नवी मुंबईतील एका अपघातात दोन कारच्या धडकेनंतर एअरबॅग उघडल्याने सहा वर्षांच्या मुलाच्या मानेला जबर मार लागला. त्यामुळे तो जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी सेक्टर 15 मध्ये राहणारे मावजी आरेठिया हे त्यांचा मुलगा हर्ष आणि दोन पुतण्यांसोबत रात्री 11 वाजता फिरायला गेले होते. वॅगनर कारमध्ये जात असताना त्यांनी हर्षला बाजूच्या सीटवर बसवलं होतं. यावेळी कोपरखैरणेकडे जात असताना ब्लू-डायमंड चौकात वॅगनर कारला दुसऱ्या कारने धडक दिली.
हे ही वाचा >> Maharashtra Weather Update : 27 आणि 28 डिसेंबरला विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, वाचा तुमच्या जिल्ह्याची अपडेट
या अपघातात दोन कारची धडक एवढ्या जोरात झाली की, अजेठिया यांच्या कारच्या समोरील दोन्ही एअरबॅग उघडल्या. त्यामुळे समोरच्या सीटवर बसलेल्या हर्षच्या मानेला एअरबॅग मुळे जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलांना पुढच्या सीटवर बसवण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
या घटनेनंतर मुलांना पुढच्या सीटवर बसवावं की नाही अशी शंका आता पालकांच्या मनात येतेय. कारण लहान मुलांची उंची कमी असते. अशा स्थितीत एअरबॅग उघडल्यावर छातीऐवजी थेट तोंडावर येऊन आदळते. हर्षच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.
हे ही वाचा >> Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाचा ED ला मोठा दणका! लॅपटॉप, मोबाईल जप्त करुन डेटा...
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत कार तज्ज्ञ इर्शाद सिद्दीकी सांगतात की, भारतात मुलांच्या पुढच्या सीटवर बसण्याबाबत कोणताही कायदा नाही. पण परदेशात मुलांना गाडीमध्ये पुढच्या सिटवर बसण्यास बंदी आहे. जे लोक लावू शकतात त्यांनीच समोर बसावं.