3 मुलांच्या आईचं 12 वी च्या विद्यार्थ्याशी जडलं प्रेम! मंदिरात तिसरं लग्न करायला गेली, पण घडलं असं...
Viral Love Story News : उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनं दुसऱ्यांना लग्न तर केलंच, पण ती महिला पुन्हा एकदा बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन लग्नानंतर 12 वी च्या विद्यार्थ्याशी केलं लग्न

महिलेनं धर्म बदलला आणि मंदिरात केलं तिसरं लग्न

नेमकं प्रेम प्रकरण आहे तरी काय?
Viral Love Story News : उत्तर प्रदेशमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनं दुसऱ्यांना लग्न तर केलंच, पण ती महिला पुन्हा एकदा बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. त्यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने पोटच्या मुलवांना सोडलं. लग्नासाठी या महिलेनं तिचा धर्म आणि नाव दोन्ही बदलले आहेत.
दोन लग्नानंतर 12 वी च्या विद्यार्थ्याशी केलं लग्न
रिपोर्टनुसार, ही घटना अमरोहा येथील आहे, असं सांगितलं जात आहे. सैद नगली परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं तिसरं लग्न केलं आहे. शबमन असं या महिलेचं नाव असल्याचं बोललं जात आहे. याआधी तिने दोन लग्न केले होते. सर्वात आधी तिने अलिगढ येथे राहणाऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. परंतु, हे लग्न काही दिवसातच मोडलं. त्यानंतर या महिलेनं दुसरं लग्न अमरोहाच्या सैद नगरीत केलं. दुसऱ्या लग्नानंतर तिला 3 मुलं झाली.
हे ही वाचा >> 8th April 2025 Gold Rate : बाईईई...काय हा प्रकार! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, आजचे दर काय?
परंतु, एका रस्ते अपघातात मुलं जखमी झाली. याच दरम्यान शबमनची जवळीक शेजारी राहणाऱ्या 12 वीत शिकणाऱ्या मुलासोबत वाढली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर या महिलेनं दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट घेतला आणि तीन मुलांना सोडलं. त्यानंतर या महिलेनं शेजारी राहणाऱ्या मुलासोबत लग्न केलं.
धर्म बदलला, नाव ठेवलं शिवानी
हे संपूर्ण प्रकरण लक्षात घेता ग्रामपंचायीतने महिलेच्या बाजूने निर्णय दिला. महिला तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही राहू शकते, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे शबनमने हिंदू धर्म स्विकारून नाव बदललं आणि शिवानी ठेवलं. त्यानंतर तिने 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत लग्न केलं. मी माझ्या मर्जीने धर्म बदलला आणि लग्न केलं. लग्नानंतर मी आनंदात आहे आणि मला कोणतीही अडचण नाहीय. माझ्या वैयक्तीक जीवनात कोणीही हस्तक्षेप करू नये, असं या महिलेनं म्हटलं आहे.