Sharad Pawar : “आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी…”, पवार स्पष्टच बोलले
शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. पवारांनी नेमकी काय भूमिका मांडली, वाचा…
ADVERTISEMENT
Sharad Pawar on Ram Mandir Pran Pratishtha : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. शरद पवार यांनीही या मुद्द्यावरून भाजपला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
निपाणी येथे बोलताना शरद पवार म्हणाले, “आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आहात. रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्या पंचगंगा कारखान्यात रावसाहेब पाटील 10 वर्षे संचालक होते. तसे निपाणी परिसरात व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत इथे सहकार रुजवला. साखर उद्योगाबरोबर सोसायट्या उभा केल्या. त्यांच्या विश्वासावर 1800 कोटींच्या ठेवी लोकांनी ठेवल्या. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. पण, आज देखील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आहे. कर्जमाफीसाठी आम्ही या सरकारकडे वारंवार प्रयत्न करतोय”, असं शरद पवार म्हणाले.
राम मंदिरावरून भाजपला केलं लक्ष्य
“अयोध्येतील श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. इथली मशीद पडल्यानंतर इथे राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला होता. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत”, असा भाष्य शरद पवारांनी केलं.
हे वाचलं का?
हेही वाचा >> पटोलेंविरोधात काँग्रेसमध्ये ‘धुसफूस’, केदार म्हणाले, ‘अन्याय झालाय’
“राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी 10 दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा”, असा खोचक सल्ला शरद पवार यांनी मोदींना दिला.
“कर्नाटकातील निकाल विश्वास वाढवणारा”
“या सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होते, पण शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणे राबवणाऱ्या लोकांना बाजूला केले पाहिजे. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. धार्मिक प्रश्नावर लोकांची मने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय”, असा गंभीर आरोप शरद पवारांनी केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?
“माझा एका निवडणुकीत पराभव झाला होता. मी मुंबईचा अध्यक्ष होतो. क्रिकेटच्या संस्थेत माझा बंगालच्या माणसाने पराभव केला, पण नाउमेद व्हायचं नाही. मी आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष झालो. एक दिवस मी जागतिक क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झालो”, असा अनुभवही शरद पवार यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT