Pope Francis Death: वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी घेतला अखेरचा श्वास; प्रदीर्घ आजाराने निधन
ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

वयाच्या 88 व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांचे निधन

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाचं कारण
Pope Francis death: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच वर्षांपासून आजाराचा सामना करत होते.
व्हॅटिकनने सोमवारीच एक निवेदन जारी केले आणि त्यात पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन धर्मगुरू होते, असं सांगितलं गेलं. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया असल्याचं वृत्त समोर आलं आणि यामुळेच त्यांची प्रकृती चिंताजनक राहिली. ते बराच काळ रुग्णालयात दाखल होते. 38 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे निधन त्यांच्या कासा सांता मार्टा (Casa Santa Marta) येथील निवासस्थानी झाले.
पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर रविवारचं औचित्य साधून अचानक सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती लावली होती. त्यांनी सेंट पीटर्स स्क्वेअरमधील 35000 लोकांच्या गर्दीमधील लोकांसोबत हस्तांदोलन करून अभिवादन स्वीकारले. व्हॅटिकन कार्डिनल केविन फॅरेल यांच्या मते, पोप फ्रान्सिस यांचे संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेसाठी समर्पित होते.
हे ही वाचा: वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story
पोप फ्रान्सिस यांचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, पोप यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला आणि जॉर्ज मारियो बर्गोलियो असे त्यांचे नाव होते. पोप फ्रान्सिस यांची 2013 पासून या पदावर कारकिर्द सुरू आहे. पोप बेनेडिक्ट सोळावा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले होते. कार्डिनल्सनी त्यांना 266 वे पोप म्हणून निवडले. एका बिगर-युरोपियन व्यक्तीला पोप बनवण्याची ही पहिलीच वेळ होती.
पोप यांनी 'या' हक्कांवर दिला भर
पोप फ्रान्सिस हे त्यांच्या साध्या राहणीसाठी ओळखले जात होते. ते गरीब आणि उपेक्षितांना स्वत:हून भेटायचे. त्यांनी गरिबी, असमानता आणि स्थलांतरितांच्या हक्कांवर भर दिला. त्यांनी कॅथोलिक चर्चमध्ये आर्थिक पारदर्शकतेवर सुद्धा वारंवार आपलं मत व्यक्त केलं आणि त्यासाठी काम केलं.
हे ही वाचा: राहुल गांधी अमेरिकेत गेले अन् महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून 'असं' काही बोलले की...
फ्रान्सचे अध्यक्षकांनी केलं शोक व्यक्त
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पोपच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले, "ब्युनोस आयर्सपासून रोमपर्यंत, चर्चने गरिबांना आशा आणि आनंद द्यावा, अशी पोप फ्रान्सिस यांची इच्छा होती. ते लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी प्रयत्न करत आले आहेत. देव त्यांच्या मृत्यूनंतरही ही आशा जिवंत ठेवो. या दुःखद वेळी मी आणि माझी पत्नी सर्व कॅथोलिक आणि शोकाकुल जगाप्रती आमच्या शोक व्यक्त करतो."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी G7 परिषदेत पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती आणि त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. या वर्षाच्या अखेरीस ते भारतात येतील, असे म्हटले जात होते.