Ranjit Naik-Nimbalkar: वहिनी-दादाची आत्महत्या, भावाने बोट छाटलं.. BJP खासदाराला अटक होणार?
Ranjit Naik-Nimbalkar: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी भाजपचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने आता याबाबत भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Ranjit Naik-Nimbalkar: उल्हासनगर: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन मृतक भाऊ आणि वहिनीला न्याय देण्यासाठी एका व्यक्तीने स्वत:चेच बोट छाटून घेतलं होतं. ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. ज्यानंतर तात्काळ याप्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात दोन वेळा न्यायालयात हजर केले असता, अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. काल 28 ऑगस्ट रोजी पुन्हा आरोपींना हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (ulhasnagr nanavare couple suicide case will bjp mla ranjit naik nimbalkar be arrested)
धक्कादायक बाब म्हणजे या आत्महत्या प्रकरणात माढा मतदारसंघाचे भाजप खासदार (BJP MP) रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांचे नाव आल्याने आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. याबाबतची माहिती फिर्यादीचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.
कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपत कांबळे असे न्यायालयीन कोठडीत सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख, वकील नितीन देशमुख यांना अटकपूर्व जामीन अर्जावर 28 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी ठेवली होती. मात्र, फिर्यादी धनंजय ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी सुनावणीची पुढील तारीख 1 सप्टेंबर रोजी व्हावी अशी विनंती न्यायालयात केल्याने आता खासदार रणजितसिंह निबांळकर आणि इतर आरोपीवर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती वकील भगत यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण घटना?
दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी पत्नी उज्वलासह उल्हासनगर क्रमांक 4 परिसरातील रहात्या बंगल्याच्या तीन मजली टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुरुवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजे याच्यासह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ननावरे दाम्पत्याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाइलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवासी असलेले संग्राम निकाळजे, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
घटनेच्या दिवशी पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असती त्यांच्या पॉकेटमध्ये एक चिठ्ठी सापडली होती. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ओमी टीम कलानीचे खास कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादी नेते नरेश गायकवाड, गणपत कांबळे यांची नावे सापडली.
हे ही वाचा >> Ulhasnagar: भयंकर.. ‘ज्या बोटाने भाजपला मतदान केलं तेच बोट मी तोडलं, फडणवीसांना…’
त्यानंतर व्हिडिओ आणि पत्राच्या आधारे आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पण ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस उलटूनही पोलिस तपासाला गती देत नाहीत. याला वैतागून मयताचा भाऊ धनंजय ननावरे याने गुन्हे शाखेच्या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केल्याचा आरोप करत लाईव्ह व्हिडीओ बनवत चक्क स्वतःचे बोट छाटून घेतले.
ननावरे दाम्पत्याने 2015 मध्ये रामराजे निंबाळकर यांच्या समर्थकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर नंदकुमार ननावरे आणि त्यांचे कुटुंब हे फलटण सोडून उल्हासनगरमध्ये राहण्यासाठी आले होते. त्यावेळी ननावरे यांनी आमदार ज्योती कलानी त्यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम सुरू केलेले.
ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यावेळी रामराजे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यामुळे ज्योती कलानी यांनी मध्यस्थी केल्यामुळे ननावरे यांनी ॲट्रॉसिटीच्या प्रकरणातून माघार घेतल्याची चर्चा सुरु झाली. सदरचा गुन्हा शेवटच्या टप्प्यात कोर्टात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यावर उज्वला नंदकुमार ननावरे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्ह्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे भाऊ संजूबाबा नाईक निंबाळकर यांनाही आरोपी बनवण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. पण नंतर हा ननावरेंनी हा गुन्हा मागे घेण्यास तयार झाले.
हे ही वाचा >> Live in Partner Pressure Cooker: दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय, प्रेशर कुकरने ठेचून लिव्ह-इन पार्टरनची हत्या
पण याचवेळी रामराजे यांचे राजकारणातील कट्टर विरोधक हे सध्याचे माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदरच्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये रामराजे निंबाळकर यांना अडकवून त्यांच्या समर्थकाना क्लीन चिट मिळू नये यासाठी ननावरे कुटुंबावर संग्राम निकाळजेमार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मानसिक त्रास दिला. ज्यामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. असे आरोप फिर्यादीच्या वकिलांनी केली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणामुळे आता भाजपची बरीच अडचण होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. अशावेळी माढामधील खासदार रणजितसिंह हे कायद्याच्या कचाट्यात अडकल्यास त्यांच्यासह भाजपला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT