Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं विष? कराचीत घेतोय उपचार

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Underworld don Dawood Ibrahim admitted to hospital in Karachi
Underworld don Dawood Ibrahim admitted to hospital in Karachi
social share
google news

Dawood Ibrahim Hospitalized : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदवर (dawood ibrahim news) कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विष दिलं गेल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ADVERTISEMENT

दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक यूजर्संकडून केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विष प्राशन केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दाऊदसोबत काय घडलं?

दाऊदच्या टोळीतील एका माजी सदस्याने (dawood ibrahim gang member) याबद्दल माहिती दिली की, दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे आणि त्याला ज्या मजल्यावर दाखल केलेले आहे, तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथे जाऊ शकतात.

हे वाचलं का?

हेही वाचा >> “अदानींनी मिंधे, पवारांसह पन्नासएक आमदार-खासदारांना…”

विषबाधेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. मात्र, मुंबई पोलीस अधिकारी दाऊदच्या जवळच्या नातेवाईकांकडून (पुतण्या अलिशा पारकर आणि साजिद वागळे) याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी माध्यमांनीही सोशल मीडियाचा दिला हवाला

जिओ टीव्ही न्यूजनेही सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा हवाला देत म्हटले आहे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृती ढासळल्यामुळे त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडण्याचे कारण विषप्रयोग करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

जगभरातील तपास यंत्रणांना चुकवून 65 वर्षीय दाऊद हा फरार आहे. तो अनेक वर्षांपासून कराचीमध्ये राहत असल्याचे वृत्त सातत्याने दिले जाते.

ADVERTISEMENT

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दाऊदची तब्येत अचानक बिघडण्यामागे विषप्रयोग हे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधीही दाऊदला अनेक गंभीर आजार झाल्याचा दावा करण्यात आला होता. नुकतीच अशी चर्चा झाली होती की, गँगरीनमुळे कराचीतील रुग्णालयात त्याच्या दोन बोटांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया सर्व्हर डाउन

याबाबत पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनीही यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा उल्लेख करण्यात आला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काम करत नाहीत. यूट्यूब, गुगल आदींचे सर्व्हर डाऊन झाले आहेत.

हेही वाचा >> ‘…ते सगळं दुखणं दूर करणार’, पवारांनी पुन्हा ठणकावून सांगितलं

ते म्हणाले की, दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला विष दिले गेल्याचे वृत्त आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, याची खातरजमा कोण करणार हा प्रश्न आहे. कारण याबाबत कोणी विचारणा केली तर तोही अडचणीत येईल. पाकिस्तानमध्ये सर्व सोशल प्लॅटफॉर्म सेवा अचानक ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय बळावतो. अन्यथा ही बातमी येताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा अचानक कशी कोलमडेल.”

दाऊद डी-कंपनीचा प्रमुख कसा बनला?

दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म डिसेंबर 1955 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. नंतर दाऊद इब्राहिमचे कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले. 70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने वाढू लागले. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले. तो त्याचा नेता मानला जाऊ लागला.

मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड

1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाइंड आहे. स्फोट घडवून आणल्यानंतर तो भारत सोडून दुबईला पळून गेला. यानंतर त्याने पाकिस्तानात आपले तळ बनवले. आता तो आपल्या कुटुंबासह तेथे राहतो. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले होते. 2011 मध्ये, एफबीआय आणि फोर्ब्सच्या यादीत त्याला जगातील तिसरे सर्वात वाँटेड फरारी गुन्हेगार म्हणून नाव देण्यात आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT