Oshin Sharma: 'ती' गोष्ट घडली अन् उपजिल्हाधिकारी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम...

मुंबई तक

ADVERTISEMENT

उपजिल्हाधिकारी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम... (फोटो सौजन्य: एक्स)
उपजिल्हाधिकारी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम... (फोटो सौजन्य: एक्स)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ओशीन शर्मा यांची करण्यात आली बदली

point

हिमाचल प्रदेश सरकारने का केली कारवाई?

point

ओशीनने कामात दिरंगाई केल्याचा ठपका

OShin Sharma: एक महिला अधिकारी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ओशिन शर्मा असं त्या महिला अधिकारीचं नाव आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. पण कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ओशीनला  नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ओशिनचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्राम, फेसबुक बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. पण कामात दिरंगाई केल्याबद्दल हिमाचल सरकारने तिला नोटीस बजावली आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी क्षेत्रांतर्गत संधोल येथे तहसीलदार म्हणून तैनात असलेल्या ओशिन यांची बदली करण्यात आली आहे. ज्यानंतर ओशिनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> अरे बापरे... Ekta Kapoor विरुद्ध Pocso चा गुन्हा, तिची आईही... नेमकं प्रकरण काय?

इंस्टाग्रामवर त्यांचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरही त्यांची खूप चर्चा आहे. पण कामातील दिरंगाईमुळे आता त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

ओशीन शर्मांची का झाली बदली?

वास्तविक, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मंडीचे उपायुक्त अपूर्व देवगण धरमपूर दौऱ्यावर होते. त्यांनी तहसील धरमपूर, संधोळ व उपतहसील मंडप व तेहरा येथील महसूल नोंदी तपासल्या असता इंटक, जमाबंदीसह अनेक प्रकरणे प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी ओशिन शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याशिवाय 11 कर्मचाऱ्यांना नोटीसही बजावण्यात आली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> आला रे आला! उर्फीला टक्कर देणारा आला, 'हा' बोल्ड Video पाहून लोकांना लागला 440 वोल्टचा झटका

आता कुठे मिळाली पोस्टिंग?

महसूल कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटीस बजावल्यानंतर हिमाचल सरकारने ओशीन यांची पुढील नियुक्ती आदेशापर्यंत कार्मिक विभागात बदली केली आहे.

ADVERTISEMENT

'हा' व्हिडिओ व्हायरल झाला

सुरुवातीला पदभार स्वीकारल्यानंतर महिला अधिकारी ओशिन यांनीही बाणेदारपणा दाखवला. खाण माफियांना जेरबंद करण्याच्या इराद्याने रात्री त्या थेट दऱ्याखोऱ्यात पोहोचल्या. त्यादरम्यानचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी लोकांनी त्यांचे कौतुकही केले. मात्र आता त्यांच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून आल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली.

लाखो फॉलोअर्स

ओशिन शर्मा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे 3 लाख 53 हजार फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी फेसबुकवर त्यांचे 2 लाख 96 हजार फॉलोअर्स आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT