Gold Price 4th November 2024 : दिवाळी संपताच ग्राहकांचं काळीज धडधडलं! पाहा आजचे 24 कॅरेटचे भाव...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले होते.

point

दिवाळी संपताच आता सोन्याचे भाव स्थिरावलेत.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Today Gold Price  in Maharashtra : ऐन दिवाळीत सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडले होते. मात्र, आता दिवाळी संपताच ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. कारण आजही (04 नोव्हेंबर 2024) सोन्याचे भाव स्थिरावले आहेत. लग्नसराईचे दिवस सुरू होताच सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक गुड न्यूज आहे. सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली, यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठला. अशा परिस्थिती आता दिवाळी संपताच हे भाव स्थिरावलेत. चला तर मग सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices Settled down today 4 november 2024 after diwali what are the rates of 24 22 and 18 carat gold Mumbai Pune)

ADVERTISEMENT

Gold Rate in India Today:भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Manoj Jarange : 'ह्याला पाड आणि त्याला पाड ही आपली भूमिका...'; निवडणुकीबाबत जरांगेंची मोठी घोषणा!

Gold Silver Rate of 1 kg: वेबसाईटनुसार, रविवारी (03 नोव्हेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,400 रूपयांवर पोहोचला होता. आज यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 97,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

हेही वाचा : Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Mumbai Gold Price Today:

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

Latest Gold Rate in Pune:

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

Nagpur Gold Rate:

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

Nasik latest Gold Price:

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

22 Carat and 24 Carat Gold Silver Difference :सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT