Gold Rate on Bhaubij : अरे व्वा! लाडक्या बहिणीसाठी खरेदी करता येणार सोनं? आजचे भाव...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाऊबीजच्या शुभदिनी देशातील 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹80,400 इतका आहे.

point

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold Price Today : आज भाऊबीजच्या शुभदिनी देशातील 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹80,400 इतका आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात देशभरात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे या उत्सवाच्या काळात ग्राहकांची वाढती मागणी आणि बाजारातील अस्थिरता जाणवत आहे. पण आज (3 नोव्हेंबर 2024) बहिणीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या भावांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्याचे दर स्थिरावले आहेत. (gold silver rates on bhaubij diwali in maharashtra today 03 november 2024 Check out 24 22 and 18 carat gold prices)

ADVERTISEMENT

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

हेही वाचा : Ajit Pawar : ...म्हणून आम्ही वेगळा पाडवा साजरा करायचा निर्णय घेतला, अजित पवार यांनी सांगितलं कारण

भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता

Gold Price on bhaubij Today : Good Return वेबसाईटनुसार, शनिवारी (02 नोव्हेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,400 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. हा भाव कायम असल्याचं दिसून येत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 97,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

Gold and Silver Price in your city: तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

पुणे

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,700 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,400 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,300 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,730 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,430 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,330 रूपये आहे.

Difference Between 22 and 24 Carat Gold:22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.


 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT