Russia : येवजेनी प्रिगोझिन यांच्या वॅग्नेरने व्लादिमीर पुतिन विरोधात का केलं बंड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

conflict of wagner group and russia : Putin's friend and Belarusian President Alexander Lukashenko played an important role in ending this rebellion.
conflict of wagner group and russia : Putin's friend and Belarusian President Alexander Lukashenko played an important role in ending this rebellion.
social share
google news

russia wagner group explained : युक्रेन-रशियात युद्धसंघर्ष सुरू असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात मोठं बंड छेडलं गेलं. हे बंड 12 तासांतच शमलं. अखेर शनिवारी रात्री वॅग्नेर या लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि रशिया यांच्यात करार झाला. रशियाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची चर्चा करणाऱ्या येवजेनी यांनी अवघ्या 12 तासांतच भूमिका बदलत कराराच्या टेबलावर आले. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी वॅग्नेर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि रशिया सरकारमध्ये करार घडवून आणला. या करारानंतर प्रिगोझिनने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचे आदेश दिले.

ADVERTISEMENT

पुतिन यांनी येवजेनीविरुद्ध इतका कडकपणा दाखवला की, ते यापुढे रशियाला नाही तर बेलारूसला जाणार आहेत. त्यानंतर येवजेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी उशिरा अचानक घोषणा केली की बंड मागे घेतलं आहे.

येवजेनीचा यू टर्न

येवगेनी प्रिगोझिन यांनी अधिकृत टेलिग्राम चॅनेलद्वारे एक निवेदन जारी केले की, “रक्तपात होऊ शकतो म्हणून एका पक्षाने जबाबदारी समजून घेतली जेणेकरून ते रोखता येईल. आम्ही आमच्या टोळ्या माघारी बोलवत आहोत आणि ठरल्याप्रमाणे फील्ड कॅम्पमध्ये परत जात आहोत. निवेदनानंतर काही तासांतच वॅग्नेरचे सैन्य ट्रकमध्ये बसून शहरं सोडताना दिसले. महत्त्वाची बाब म्हणजे लोकांनी वॅग्नेर सैनिकांसोबत सेल्फी काढून त्यांचा जयजयकार केला.

हे वाचलं का?

लुकाशेन्को यांनी बजावली महत्त्वाची भूमिका

पुतिन यांचे मित्र आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी हे बंड संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यस्थाची भूमिका बजावत लुकाशेन्कोने रशिया आणि येवजेनी यांच्यात एक करार केला, ज्यानंतर येवजेनीने आपल्या सैन्याला माघारी फिरण्याचे आदेश दिले. लुकाशेन्कोच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, या चर्चेदरम्यान पुतिन यांच्याशी सतत समन्वय साधला गेला. त्यानंतर करारावर सहमती होऊ शकली आणि येवजेनी मागे हटण्यास तयार झाले. येवजेनी आता बेलारूसमध्ये राहणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणतात, ‘खासगी रशियन लष्करी कंपनी वॅग्नेरचे प्रमुख तणाव कमी करण्याच्या करारांतर्गत शेजारच्या बेलारूसमध्ये जातील आणि त्यांच्यावरील फौजदारी खटला बंद केला जाईल.’

काय आहे करार?

क्रेमलिनने स्पष्ट केले आहे की, बंडखोरी प्रकरणात येवजेनी प्रिगोझिनवरील आरोप मागे घेतले जातील आणि त्याच्यासोबत लष्करी गटात सामील झालेल्या सैनिकांवर कारवाई केली जाणार नाही. येवजेनी स्वतः बेलारूसला जाईल. याव्यतिरिक्त, बंडखोरीमध्ये भाग घेतलेल्या सैनिकांवर कारवाई केली जाणार नाही, परंतु त्याऐवजी त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची संधी दिली जाईल. पुतिन दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत आहेत. हे संकट कमी करण्यासाठी सरकारने हा करार मान्य केला आहे.

ADVERTISEMENT

येवजेनीला मिळाला नाही पाठिंबा

पुतिन यांनी येवजेनीची कमकुवत नस पकडली होती. रोस्तोव्ह शहरातून येवजेनीला ज्या प्रकारचा पाठिंबा मिळाला, त्यामुळेच त्याचे मनोबल वाढले आणि पुतिनचा ताण वाढला. यानंतर, जेव्हा वॅग्नेर ग्रुपचे सैन्य पुढे सरकू लागले तेव्हा त्यांना रोस्तोव्हमध्ये जसा सार्वजनिक पाठिंबा मिळाला तसा मिळाला नाही. त्याचवेळी पुतिन यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना चिरडून टाकले जाईल, असे स्पष्टपणे सांगितले तेव्हा येवजेनी बॅकफूटवर आले. वॅग्नेरचे सैनिक मॉस्कोच्या दिशेने कूच करतील, असा इशारा प्रिगोझिनने दिला होता. दुसरीकडे वॅग्नेरने हळूहळू बॅकफूटवर जायलाही सुरूवात केली होती. पुतिन यांनी येवजेनीची ही कमकुवत नस पकडली आणि सत्तापालटाची चर्चा करणाऱ्या येवजेनींना तडजोड करण्यास भाग पाडले.

ADVERTISEMENT

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा आदेश

प्रिगोझिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रक्तपात थांबवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. वॅग्नेर लष्कर छावणीकडे परत जाईल. ते आता मॉस्कोच्या दिशेने जाणार नाहीत. आम्ही आमचा ताफा माघारी बोलवत आहोत. आम्ही मॉस्कोला जाणारा ताफाही थांबवला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Pune, MPSC: ‘दर्शना पवारला राहुल दीदी, दीदी… बोलयचा’, धक्कादायक माहिती समोर

यापूर्वी रशियन सैन्याने मॉस्कोकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. अध्यक्ष पुतिन यांनी वॅग्नेर नेत्यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते. संदेशात पुतिन यांनी या बंडखोरीला ‘विश्वासघातकी’ आणि ‘देशद्रोही’ म्हटलं होतं. त्यांनी बंडखोरांना संपवण्याचे आश्वासन दिले होते.

कशी झाली सुरूवात, काय घडलं?

व्लादिमीर पुतिन यांच्या भाषणानंतर वॅग्नेर यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलद्वारे एक निवेदन जारी केले. या निवेदनात वॅग्नेरच्या प्रमुखांनी सांगितलं की, पुतिन यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. रशियाला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे ते म्हणाले. वॅग्नरने असेही सांगितले की विजय आमचाच असेल आणि एक किंवा दोन देशद्रोही लोकांचे प्राण 25,000 सैनिकांच्या जीवापेक्षा महत्त्वाचं ठरवलं गेलं. रशियातील गृहयुद्ध आता अधिकृतपणे सुरू झाल्याचे वॅग्नेरच्या वक्तव्यात म्हटले होते

बंडखोरीचे खरे कारण काय?

खरं तर, वॅग्नेर ग्रुप ही रशियामधील भाडोत्री सैनिकांची खाजगी लष्कर आहे, ज्याचे नेतृत्व येवजेनी करत आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धात या सैनिकांनी रशियन सैनिकांसोबत मिळून युक्रेनसोबत युद्धात उतरले आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती. या युद्धादरम्यान, रशियन सैन्य आणि वॅग्नेर गट यांच्यातील तणाव वाढला. त्यानंतर वॅग्नेर गटाचे प्रमुख येवजेन प्रिगोझिनने रशियाच्या लष्करी नेतृत्वाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. रशियाने युक्रेनमधील त्यांच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र रशियाने हे फेटाळून लावलं आहे. परंतु येवजेनी यांनी संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांना हटवण्याचा प्रयत्न केला, जे युक्रेनमधील युद्ध हाताळण्यासाठी बराच काळ चर्चेत आहेत.

पुतिन यांना झाली होती जाणीव

पुतिन यांना लक्षात आले होते की, खाजगी सैन्य आपल्या विरोधात बंड करू शकते, म्हणून त्यांनी ते विसर्जित करण्याच्या दिशेने पावले उचलली होती. पण, पुतिन यांनी हे पाऊल उचलण्याआधीच येवजेनीने बंडाचे निशाण फडकावले आणि सैनिकांसह मॉस्कोच्या दिशेने कूच केली होती.

प्रिगोझिनला ठरवलं गद्दार

क्रेमलिनने त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला की नाही हे प्रिगोझिन यांनी सांगितले नाही. सध्या जर पुतिन यांनी शोइगुला हटवण्यास सहमती दर्शवली, तर राष्ट्राध्यक्षांसाठी हा राजकीयदृष्ट्या हानीकारक निर्णय ठरू शकतो. कारण त्यांनी प्रिगोझिनला पाठीवर वार करणारा गद्दार म्हटले आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी पुतिन यांनी रशियन जनतेला संबोधित करताना प्रिगोझिनने ‘त्यांच्या पाठीत वार केला’ असं म्हटलं.

पुतिन यांची पकड कमकुवत!

समजून घ्यायचं झालं तर करारामध्ये वॅग्नेर ग्रुपचे विघटन आणि रशियन सशस्त्र दलात त्याचे सैनिक समाविष्ट करण्याचे संकेत मिळत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गेल्या 24 तासांतील घडामोडींवर कोणतेही संबोधन किंवा थेट प्रतिक्रिया देणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >> मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?

जनतेपासून दूर राहिल्यामुळे पुतिन यांची सत्तेवरील पकड कमकुवत होत आहे आणि येवजेनी यांचे अयशस्वी बंड हे त्याचेच उदाहरण आहे. रशियन राज्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शनिवारी सांगितले की वॅग्नेरचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांच्यावरील फौजदारी आरोप वगळले जातील, असे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT