‘शाहरुख खान, स्टॅलिन यांना गोळ्या घालणाऱ्यांना 25 कोटी’, जगद्गुरु परमहंस आचार्य कोण?
उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनबद्दल केलेल्या टिप्पणीवर परमहंस आचार्य यांनी उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचे बक्षीस देऊ असे सांगितले होते.
ADVERTISEMENT
Paramhans Acharya: देशात मुद्दा राजकारणाचा असो की, चित्रपटांचा त्यावर अयोध्येचे जगद्गुरु परमहंस आचार्य (Paramhans Acharya) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते शाहरुख खानवर (Shaharukh khan) वादग्रस्त वक्तव्य करतात. तर कधी उदयनिधी स्टॅलिनला (Stalin) धमकी देतात. मात्र आता त्यांच्या निशाणावर आले आहेत, समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते स्वामी प्रसाद मौर्य.(Swami Prasad Maurya) त्यानी म्हटले आहे की, जो कोणीही स्वामी प्रसाद मौर्यला गोळी मारेल त्याला 25 कोटीचे बक्षीस दिले जाईल. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे परमहंस आचार्यांवर टीकाही केली जात आहे.
ADVERTISEMENT
मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश
या सर्व प्रकारामुळेच आता लोकांना प्रश्न पडला आहे की जगतगुरु परमहंस आचार्य नेमके कोण आहेत. ते मध्य प्रदेशातून थेट उत्तर प्रदेशातील अयोध्येत कसे पोहचले. त्याचबरोबर अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडून का केली जातात. आणि त्या पुढचं त्यांचे नेमकं आयोजन काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
महंतपदाची गादीही मिळाली
परमहंस आचार्य यांना अनेक प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आता या क्षणी मी अयोध्येतील तपस्वी छावणीचा पीठाधीश्वर आहे. रामघाटाजवळ आमचा आश्रम आहे. ते सांगतात की, मी मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील आहे. मी लहानपासूनच संन्यासी जगत आलो आहे. संन्यास घेतल्यानंतर मी अनेक तिर्थक्षेत्रांना भेटीगाठी दिल्या. तर प्रारंभी अयोध्या, वृंदावन आणि काशी या ठिकाणी राहिलो आहे. ऋषिकेशमध्ये स्वामी रामसुख दास यांच्या आश्रमातही राहिलो आहे. हिमालयातही खूप भटकलो आहे. त्यानंतर 2017 मध्ये तपस्वी छावणीचे गुरुदेव सर्वेश्वर दास यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्याचवर्षी मला छावणीच्या महंतपदाची गादीही मिळाली असल्याचे ते सांगतात.
हे ही वाचा >> MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले
धर्मासाठी सत्य बोलणे
तुम्ही अशी वादग्रस्त वक्तव्य का करता, त्याच्या पाठीमागची कारणं काय या प्रश्नावर ते म्हणतात की, मग ते लोक दुसऱ्या धर्मावर का टीका करत नाहीत. त्यावर का बोलत नाहीत एकही शब्द. कारण त्यांना माहिती आहे की, त्यावर बोलले तर आपला जीव जाऊ शकतो. मात्र सध्या सनातनवर टीका करणं ही फॅशन झाले. त्यामुळे कोणीही येतो आणि आमच्या धर्मावर टीका करतो आणि निघून जातो. याकडे पहिल्यांदा मी दुर्लक्ष केले, मात्र आता त्यावर प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटू लागले आहे. आणि तेही त्यांच्याच भाषेत मी उत्तर देऊ लागलो. त्यातच मी या विरोधात आवाज उठवला नाही तर मी मग माझा जिवंत राहून उपयोग काय असा प्रतिसवालही ते करतात. प्रसिद्धीसाठी माध्यमांमधून चर्चेत राहणे हा मुद्दा नाही तर धर्मासाठी सत्य बोलणे हा त्यापाठीमागचा उद्देश्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुंग्यांचा जीव वाचवणारे
परमहंस आचार्य यांना गोळीबार आणि शिरच्छेद यावर तुम्ही का बोलता असाही सवाल त्यांना केला. त्यावर ते म्हणतात की, आमचं कोणाचंही वैर नाही. ना शाहरुख खानकडून ना कुणाकडून. आपण मुंग्यांना जीव वाचवणारे लोकं आहेत. मात्र या लोकांनी आमच्या धर्मावर भाष्य करू नये. तसेच काही समजत नसेल तर आचार्य आणि विद्वान लोकांना विचारा आणि मग त्याविषयी बोला असंही त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> EPFO Tips: नोकरी बदलताच काढू नका पीएफचे पैसे, बसेल 86 लाखांचा फटका
विनम्रपणही सांगता येईल
आचार्यांना हेही सांगण्यात आले की, तुम्ही हे विनम्रपणेही सांगता येईल का, त्यावर ते म्हणाले हो हो का नाही. मात्र स्वामी प्रसादसारखी लोकं योग्य कमेंट करत नाहीत. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले, तेव्हा भगवान श्रीरामांनी सीतेला सन्मानाने परत करण्याची विनंती केली होती. तेव्हा त्याला मारायचे नव्हते. पण रावणाला ते मान्य नव्हते. मात्र त्यानंतर त्याला लढई करणं भाग पडले. त्यामध्ये अनेक लोगं नंतर मारली गेली.
ADVERTISEMENT
भाषेची पर्वा नसते.
त्याचप्रमाणे मीसुद्धा आदराने आणि आपुलकीने समजावून सांगायला तयार आहे मात्र कोणी तरी सहमत असेल तरच. या लोकांना प्रेम, सन्मान, आदर या भाषेची पर्वा नसते. मी जेव्हा त्यांच्याच भाषेत उत्तर देतो तेव्हाच खरी चीड येते. कारण उदयनिधी, स्टॅलिनवर वक्तव्य केल्यानंतर मात्र त्यावर लगेचच अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मी हितचिंतक
यावेळी बिहारचे मंत्र्याने मानसच्या चौपईचा चुकीचा अर्थ लावला तेव्हाच मी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर ते म्हणू लागले की, माझा मानसला नव्हे तर चौपईच्या एका भागावर आक्षेप आहे. म्हणूनच मी म्हणतो, तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञांकडे जा मात्र खोटी विधाने करु नका असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या सर्व प्रकारामुळे समाजात चुकीचा अर्थ जाण्याची शक्यता आहे. धर्माबाबत खोटी विधाने करू नका कारण त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. भावना दुखवल्या जातात. मी थेट जरी बोलत असलो तरी मी कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वांचा मी हितचिंतक आहे.
हे ही वाचा >> Kalyan Crime: बार गर्ल दलाल, निवृत्त पोलिसाचा मुलगा अन्.. उल्हासनगरमध्ये घडलं भलतंच कांड!
राम मंदिराचा मुद्या पेटवला
कधी उपवास, कधी जलसमाधी तुम्हाला काय साध्य करायचे आहे? या प्रश्नावर ते म्हणाले की, काय साध्य करायचे? यावर ते म्हणाले की हे सर्व आमच्या मागण्यांसाठी आम्ही केले आहे. त्यामुळेच आणि ते पूर्ण करण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडतात. राम मंदिराच्या मुद्द्यावरून मुद्या पेटवला गेला तरी हा मुद्दा आता देशभर गाजत आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेमुळेच राममंदिराचा प्रश्न चर्चेत राहिला. तरीही दुसरा एक मुद्दा पेटाला सगळा आवाज मंदिराच्या दिशेने उभा राहिला. आमच्या निर्णायामुळे मात्र अयोध्येत मांस आणि अंडी बंदी करण्यात आली.
हिंदू राष्ट्रासाठी उपोषण
परमहंस आचार्य यांनी 2018 मध्ये त्यांनी राम मंदिरासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. हे उपोषण खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच मोडले. त्यानंतर शंकराचार्यांनी मोडलेल्या कुंभातही उपवास केला. यानंतर त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी त्यांची अंत्ययात्राही काढण्यात आली सजवली. येत्या 7 नोव्हेंबरला मी पुन्हा हिंदू राष्ट्रासाठी उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिहादीची कातडी
परमहंस आचार्य यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबाबत वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा ते म्हणाल की, मी शाहरुख खानला शोधत आहे, ज्या दिवशी तो सापडेल, मी त्या जिहादीची कातडी करून त्याला जिवंत जाळून टाकेन. माझी माणसे मुंबईत त्याचा शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदयनिधींचा शिरच्छेद
एवढेच नाही तर उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनबद्दल केलेल्या टिप्पणीवर परमहंस आचार्य यांनी उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचे बक्षीस देऊ असे सांगितले होते. त्यांच्या धमकीच्या व्हिडिओवर खुद्द उदयनिधी यांनी प्रतिक्रिया दिली होती. उदयनिधी यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले होते की ज्यांनी माझा शिरच्छेद करणाऱ्यांना 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे तो खरा संत आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात? ते माझ्या केसांना कंघी करण्यासाठी 10 कोटी रुपयांची घोषणा करत आहेत, जर तुम्ही मला 10 रुपयांची कंगवा दिली तर मी हे काम स्वतः करेन.
कायदेशीर मदत
या वक्तव्याविरोधात परमहंस आचार्य यांनी सांगितले की,जो कोणी स्वामी प्रसाद मौर्य यांना गोळ्या घालेल. त्याला 25 कोटी रुपयांचे बक्षीसही देणार आहे. मी पैसे त्याच्या घरी पाठवीन आणि त्याला कायदेशीर मदतही देईन, कारण त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता हे अजिबात सहन केले जाणार नाही. असे असूनही त्याला कोणी गोळी मारली नाही तर गरज पडल्यास मी स्वत: त्याला गोळ्या घालीन.
मॉल अपवित्र
एवढेच नाही तर देशाचे विभाजन करणारे मोहम्मद अली जिना आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुतळेही जाळण्यात आल्याचे परमहंस आचार्य म्हणाले.लुलू मॉल साफ करण्याच्या प्रयत्नांवरून वाद निर्माण झाला.याशिवाय 2022 मध्ये लखनऊच्या लुलू मॉलमध्ये परमहंस आचार्य देखील वादात सापडले आहेत. परमहंस आचार्य मॉलमध्ये नमाज अदा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर त्यांच्या समर्थकांसह तेथे पोहोचले होते. नमाज अदा केल्याने मॉल अपवित्र झाला असून त्याची शुद्धीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना आत जाऊ न दिल्याने मोठा गोंधळ उडाला.
हे ही वाचा >> Crime : घरात एकटाच होता 5 वर्षाचा मुलगा, आधी पॉर्न व्हिडीओ दाखवला आणि नंतर…
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT