मुंबई Tak Impact: गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट, थेट 7 पोलिसांवर ‘ही’ कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

1 police officer and 6 constable suspended of after mumbai tak exclusive report in captivity lavish lifestyle of dhfl promoters kapil and dheeraj wadhawan marathi news in today
1 police officer and 6 constable suspended of after mumbai tak exclusive report in captivity lavish lifestyle of dhfl promoters kapil and dheeraj wadhawan marathi news in today
social share
google news

Wadhawan Brother Mumbai Tak Impcat: दीपेश त्रिपाठी, मुंबई: डीएचएफएल (DHFL) या फायनान्स कंपनीचे माजी प्रमुख कपिल आणि धीरज वाधवान हे बँक घोटळ्यांच्या आरोपाखाली सध्या कैदेत आहेत. मात्र, असं असताना देखील त्यांच्यावर पोलिसांची बरीच मेहेरनजर असल्याचं मुंबई Tak ने उघडकीस आणल्याने राज्यातील गृह खात्यात एकच खळबळ माजली. वाधवान भाऊ (Wadhawan Brothers) हे कैदत असताना राजेशाही थाट उपभोगत असल्याचं मुंबई Tak ने समोर आणल्यानंतर अवघ्या काही तासात 7 पोलिसांचं निलंबन (7 Police Suspend) करण्यात आलं. (1 police officer and 6 constable suspended of after mumbai tak exclusive report in captivity lavish lifestyle of dhfl promoters kapil and dheeraj wadhawan marathi news in today)

ADVERTISEMENT

कपिल आणि धीरज वाधवान हे मेडिकल चेकअपच्या नावाने तळोजा जेलमधून मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) येत सर्व अलिशान सुखसोयी उपभोगत असल्याचं मुंबई Tak ने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. ज्यामुळे थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यामुळे या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार काल रात्री उशिरा नवी मुंबई पोलीस दलातील 7 पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूच्या एस्कॉर्ट टीममधील एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण सात पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं.

वाधवान प्रकरणात निलंबन करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं:

  1. पोलीस उपनिरीक्षक: आशुतोष देशमुख
  2. पोलीस हवालदार: रवींद्र देवरे, विशाल दखने
  3. पोलीस शिपाई: प्रदीप लोखंडे, सागर देशमुख, माया बर्वे, प्राजक्ता पाटील

या पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डीएचएफएल या फायनान्स कंपनीचे माजी प्रमुख कपिल आणि धीरज वाधवान हे बँक घोटळ्यांच्या आरोपाखाली तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असताना देखील वाधवान बंधू सर्व अलिशान सुखसोयींचा आनंद घेत असल्याचं मुंबई Tak ने Exclusive रिपोर्टमधून समोर आलं. वाचा नेमका तो रिपोर्ट काय:

ADVERTISEMENT

तारीख 7 ऑगस्ट, वेळ दुपारी 12 वाजता:

केईएम हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये प्रायव्हेट कार उभ्या होत्या. नातेवाईक आणि कर्मचारी कपिल वाधवान यांची वाट पाहत होते. कपिल वाधवान पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमध्ये बसले. कारमध्येच त्यांना जेवण, नाश्ता, कॉफी दिली गेली. याच कारमध्ये ते घरच्यांसोबत निवांत गप्पा मारत असल्याचं दिसून आलं.

ADVERTISEMENT

इतकंच नाही तर फोन आणि लॅपटॉप देखील त्यांना वापरण्यासाठी दिला गेला. वाधवान यांच्यासोबत आलेल्या पोलिसांना देखील नाश्ता ऑफर केला गेला. याच कारमध्ये बसून वाधवान ऑफिसची कामं देखील करत होते. दुपारी १२ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कपिल वाधवान हे याच कारमध्ये बसून त्यांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत होते.

तारीख 9 ऑगस्ट, वेळ सकाळी 11.40 वाजता

जेजे हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाड्यांची ये-जा सुरु आहे. काही गाड्यांची सातत्याने जागा बदलली जाते. काही वेळात एका अलिशान कार पार्किंगमध्ये येते. थोड्या वेळातच एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून धीरज वाधवान बाहेर येतात. बाहेर येत आपल्या कुटुंबीयांची ते भेट घेतात. कैदी नाही तर एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे धीरज वाधवान हॉस्पिटलच्या आवारात फिरताना दिसतात. कपिल वाधवान यांच्याप्रमाणेच अलिशान ट्रिटमेंट धीरज वाधवान यांना देखील दिली जात आहे. सकाळी 11.40 वाजेपासून ते रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत धीरज वाधवान जेजे हॉस्पिटलच्या आवारात मोकळे फिरत असतात.

वाधवान बंधूंवर नेमके काय आरोप?

कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावर 17 बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. 34 हजार 614 कोटींचा घोटाळा केल्याचा वाधवान बंधूंवर आरोप आहे. हा भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. खासगी बँकेचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन एप्रिल 2020 साली सीबीआयने वाधवान बंधूंना अटक केली होती. वाधवान बंधूंवर अनेक सीबीआय आणि पोलीस केसेस आहेत. त्याचबरोबर ईडीने देखील या दोन्ही भावांवर केसेस दाखल केल्या आहेत.

कोरोनाच्या काळात भारतात कडक लॉकडाऊन असताना याच वाधवान कुटुंबाने मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास अलिशान कारमध्ये केला होता. त्यावेळी गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला प्रवास करण्यासाठीचं पत्र दिलं होतं. आता हेच अमिताभ गुप्ता महाराष्ट्र कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत.

अनेक कैदी वैद्यकीय सुविधेअभावी कारागृहात पडून असताना वाधवान बंधू मात्र कारागृहाच्या बाहेर अलिशान दिवस घालवत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई Tak च्या Exclusive रिपोर्टनंतर गृहमंत्री फडणवीस काय म्हणालेले?

दरम्यान, मुंबई Tak च्या या Exclusive रिपोर्टनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणालेले की, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यामध्ये जे कोणी दोषी आढळलतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’

दुसरीकडे, डीसीपी संजय पाटील यांनी मुंबई Tak शी संवाद साधताना सांगितले की, ‘वाधवान बंधूंना रुग्णालयात घेऊन जाणारे कर्मचारी हे नवी मुंबई पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत आणि आम्ही ही बातमी पाहिली आहे. प्रथमदर्शनी जे दिसतंय ते योग्य आहे. त्यामुळे सर्वांवर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे, यासोबतच प्रत्येक वाहनात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. ज्या तारखांना त्यांना रुग्णालयात नेण्यात आले त्या सर्वांची तपासणी केली जाईल.’ असं पाटील यावेळी म्हणाले होते.

वाधवान बंधूंविरोधात हे गुन्हे

34,615 कोटी युनियन बँक घोटाळा (CBI), येस बँक लाचखोरी प्रकरण (CBI), यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा (CBI), 14 कोटी PMAY घोटाळा (CBI), इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरण (ED), यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा (ED), येस बँक मनी लाँडरिंग (ED), 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा (ED), लॉकडाऊन उल्लंघन (Satara Police)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT