बेल्जियम, डोमिनिकन रिपब्लिक, अँटिग्वा, स्वित्झर्लंड... मेहूल चोकसी पळत राहिला, पोलिसांना कसा सापडला?
फेब्रुवारीमध्ये चोकसीच्या वकिलांनी मुंबई कोर्टात सांगितलं होतं की, रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी तो बेल्जियममध्ये आहे, भारतात परत येऊ शकत नाही. त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय यंत्रणांशी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती, पण यंत्रणांनी हा प्रस्ताव फेटाळला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मेहूल चोकसीला बेल्जियम पोलिसांनी कसं पकडलं?

स्वित्झर्लंडमध्ये पळून जाणार होता मेहूल चोकसी

CBI अधिकारी सात वर्षांपासून करत होते पाठलाग
Mehul Choksi : हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. सात वर्ष पाठलाग केल्यानंतर आणि तीन देशांतील अनेक अडथळ्यांनंतर भारतीय यंत्रणांना हे यश मिळालं आहे. चोकसीवर पंजाब नॅशनल बँकेत 12,636 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्याच्यासह त्याचा भाचा नीरव मोदी, पत्नी अमी मोदी आणि भाऊ निशाल मोदी यांच्यावरही हा आरोप आहे.
गितांजली ग्रुपचा मालक असलेला 65 वर्षीय चोकसी 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच भारतातून पळून गेला होता. त्यानं अँटिग्वाच्या गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून तिथली नागरिकता घेतली होती.
हे ही वाचा >> 64 विषयांमध्ये मास्टर, अनेक रेकॉर्ड्स, स्वत:चं ग्रंथालय... बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या 22 गोष्टी नक्की जाणून घ्या
2021 मध्ये डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. सीबीआयचं पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तिथे गेलं होतं. मात्र, चोकसीच्या वकिलांनी त्याला उपचाराची गरज असल्याचं सांगितलं आणि त्याला 51 दिवसांनंतर जामीन मिळाला. त्यानंतर तो पुन्हा अँटिग्वाला परतला आणि डोमिनिकन रिपब्लिकमधील बेकायदा प्रवेशाचे आरोपही रद्द झाले.
सीबीआय आणि ईडीने त्याचा सतत पाठलाग केला. गेल्या वर्षी तो बेल्जियममध्ये असल्याची माहिती मिळाली होती. भारतीय यंत्रणांनी तातडीने बेल्जियन अधिकाऱ्यांना सतर्क केलं. घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रेही त्यांना देण्यात आली. शनिवारी बेल्जियम पोलिसांनी चोकसीला अटक केली.
चोकसी बेल्जियममधून स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं. चोकसीने बेल्जियममध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे रेसिडेन्सी कार्ड मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आपली भारतीय व अँटिग्वाची नागरिकता लपवली होती. चोकसीची पत्नी प्रीती ही बेल्जियन नागरिक आहे.
हे ही वाचा >> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'या' तीन लोकांना मानलं गुरु; कुणाच्या नावाचा उल्लेख?
फेब्रुवारीमध्ये चोकसीच्या वकिलांनी मुंबई कोर्टात सांगितलं होतं की, रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी तो बेल्जियममध्ये आहे, भारतात परत येऊ शकत नाही. त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय यंत्रणांशी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती, पण यंत्रणांनी हा प्रस्ताव फेटाळला आणि प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू ठेवले. आता त्याच्या अटकेनंतर भारतीय अधिकारी त्याला भारतात आणण्यासाठी कार्यरत आहेत. चोकसीच्या वकिलाने त्याच्या प्रकृतीच्या कारणावरून पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याचे संकेत दिले आहेत.