Crime: ‘या’ दोन मुलींच्या हत्येने महाराष्ट्र हादरला, अंगावर काटा आणणारी कहाणी
जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन मुलींची एकाच दिवशी हत्या झाली असून त्यांचे मृतदेह देखील एकाच दिवशी सापडले. या दोन्ही प्रकरणावर थेट विधानसभेत देखील आमदारांनी मुद्दे उपस्थित केले
ADVERTISEMENT
Jalgaon and Ratnagiri Girl Murder Case: 29 जुलै 2023 रोजी जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात ज्या दोन भयंकर घटना घडल्या त्याने अवघ्या महाराष्ट्र हादरून गेला आहे. जळगावमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात एका तरुणीची अत्यंत गूढ पद्धतीने हत्या करुन तिचे संपूर्ण केस काढून तिचा मृतदेह खाडीत फेकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनांचा नेमका घटनाक्रम कसा होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (2 girls were murdered on the same day in jalgaon and ratnagiri districts a heart wrenching story rape and murder case news maharashtra live)
ADVERTISEMENT
जळगाव– 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 19 वर्षाच्या तरुणाकडून अत्याचार अन् हत्या
जळगाव जिल्ह्यात एका 9 वर्षीय मुलीची अत्याचार करुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना दिलं आहे. ज्यानंतर जळगावमध्ये आज सर्वपक्षीय संघटनांकडून भडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने जळगावमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. काल आरोपीला तपासासाठी पोलीस गावात घेऊन गेले. त्यावेळी संतप्त जमावाने त्याच्यावर तुफान दगडफेक केली. या घटनेत तीन पोलीस देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी विधीमंडळात हा मुद्दा देखील मांडला. विधानसभेत हा मुद्दा उपस्थितीत झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पीडितेच्या आई-वडिलांशी संवाद साधला. यावेळी पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Nitin desai आत्महत्या प्रकरणी ‘या’ 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणातील आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. 29 जुलैच्या दुपारी पीडित मुलगी ही दुपारी घरी एकटीच होती. आरोपीने मुलीला जनावरांच्या गोठ्यात बोलवून घेतलं. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आरोपी स्वप्नीलने तिचं तोंड दाबून थेट तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्याच केली.
ADVERTISEMENT
त्यानंतर आरोपीने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीत पीडितेचा मृतदेह लपवून ठेवला. खरं तर आरोपीला मुलीच्या मृतदेहाची दुसरीकडे विल्हेवाट लावण्याचा आरोपी प्रयत्न करत होता. पण 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी ही संपूर्ण गावात पसरली होती. त्यामुळे मृतदेह दुसरीकडे नेणं आरोपीला जमलं नाही. ज्यानंतर त्याचं पितळ उघड पडलं.
ADVERTISEMENT
सुरुवातीला मुलगी सापडत नसल्याने ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताच्या अटकेसाठी कुटुंबीयांसह नातेवाईकांनी भडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं. दुसरीकडे, दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने संपूर्ण प्रकार 1 ऑगस्ट रोजी उघडकीला आला.
ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय 19, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली.
दाभोळ- तरुणीचे संपूर्ण केस काढून केली हत्या, मृतदेह फेकला खाडीत
रत्नागिरीतील दाभोळ खाडीत देखील एका तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून झाला आहे. चिपळूण तालुक्यातील ओमली येथील निलीमा सुधाकर चव्हाण ही स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा दापोली येथे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. ती शनिवारी 29 जुलै रोजी दापोलीहून तिच्या मूळ घरी ओमळी (चिपळूण) येथे येण्यास निघाली होती. पण ती अचानक बेपत्ता झाली. त्यांनंतर दोन दिवसांनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दाभोळ खाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला.
हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘फडणवीसांच्या गुरुजींचे आगी लावण्याचे कारस्थान..’, ‘सामना’तून जहरी टीका
सदर दिवशी ती दापोलीतून खेड येथे एस.टी. स्टँडला गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्याच बरोबर खेडमध्ये एका मुलीबरोबर चिपळूणला जाणाऱ्या गाडीत बसल्याचे सुध्दा ती सीसीटीव्हीत दिसत आहे.पण त्यानंतर ती बेपत्ता झाली आणि तिचा मोबाइल बंद झाला.
मात्र तपास यंत्रणेने तपासात तिचे मोबाइल लोकेशन 29 जुलैला तपासले तेव्हा ते ठीक रात्री 12.05 वाजता रेल्वेस्टेशन अंजनी येथे दाखवत होते. त्यानंतर मात्र मोबाइल बंदच असल्याचं दाखवलं जात होतं.
धक्कादायक बाब म्हणजे, या तरुणीच्या डोक्यावरील संपूर्ण केस काढून टाकण्यात आले आहेत. तसेच तिच्या भुवया देखील पूर्णपणे उडवून टाकण्यात आल्या होत्या. अशा विचित्र पद्धतीने तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
या प्रकरणी आता असा संशय व्यक्त केला जात आहे की, त्या मुलीवर कोणत्यातरी अज्ञात इसमाने अथवा इसमांच्या समूहाने पाळत ठेवून अतिप्रसंग करून त्यानंतर तिची हत्या करुन ओळख पटू नये अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न हा करण्यात आला असावा.
दरम्यान, याप्रकरणी देखील आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत शासनाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT