धक्कादायक!लिफ्टच्या डकमध्ये पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू,नेमकं काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

kalyan 13 Year old boy dies Falling From lift
kalyan 13 Year old boy dies Falling From lift
social share
google news

A 13 Year old boy dies Falling From lift : कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) एका 13 वर्षीय मुलाचा लिफ्टच्या डकमध्ये पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पश्चिमेच्या गांधारे गावातील रिद्धी सिद्धी सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेतील मृत मुलाचे नाव हिमांशु कनोजिया (13) असून त्याच्या कुटुंबियांवर मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस (khadakpada police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सूरू आहे. (a 13-year-old boy dies after falling into elevator shaft shocking crime story from kalyan)

ADVERTISEMENT

गांधारे गावातील रिद्धी सिद्धी सोसायटीच्या जवळच हिंमाशूच्या वडिलांचे इस्त्रीचे दुकान आहे. वडिलांच्या या व्यवसायात हिमांशू त्यांना हातभार लावत असायचा.बिल्डींगमध्ये जाऊन ग्राहकांचे कपडे गोळा करायचा, तसचे इस्त्री झालेले कपडे देखील तो घरपोच करायचा. असेच बुधवारी 3 मेला ग्राहकांचे कपडे द्यायला हिमांशू ग्राहकाच्या घरी गेला होता. मात्र तो परतलाच नव्हता. हिमांशूला जाऊन अनेक तास उलटले तरी देखीस तो परतला नव्हता. त्यामुळे कुटूंबियांना काळजी वाटत होती.

हे ही वाचा : शारीरिक संबंध ठेवून… महिला पोलीसच करायची भयंकर कृत्य

असा झाला मृत्यू

हिमांशू ग्राहकांचे कपडे देऊन परतत असताना लिफ्टमध्ये (lift) अचानक तांत्रिक बिघाड झाली होती. त्यामुळे पाचव्या-सहाव्या मजल्याच्या मध्येच अचानक लिफ्ट थांबली. हिमांशूला वाटले की,आता आपण लिफ्टमध्ये अडकून राहू, या भीतीने त्याने लिफ्टचा दरवाजा उघडताच ती सुरु झाली.या दरम्यान त्याचा लिफ्टमधून तोल गेला आणि तो सहाव्या मजल्यावरून थेट लिफ्टच्या खड्यात पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

या दरम्यान कुटूंबियांनी ग्राहकाकडे जाऊन विचारपूस केली असता, त्यांनी कपडे देऊन घरी गेल्याची माहिती दिली. यावेळी कुटूंबियांनी इमारतीच्या जवळपास तपास केला असता, लिफ्टच्या (lift Duck) डकमध्ये रक्त्याच्या थारोळ्यात हिमांशू पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटूबियांनी त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले. या घटनेने कनोजिया कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.तसेच परीसरात देखील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी खडकपाडा पोलीस (khadakpada police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या, पण शेवटचा व्हि़डिओ का होतोय व्हायरल?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT