Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील 'त्या' महिलांवर दाखल होणार गुन्हा! नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अर्ज मंजूर झाला पण खात्यात एकही रूपया आला नाही
अर्ज मंजूर झाला पण खात्यात एकही रूपया आला नाही
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

कोणत्या महिलांवर होणार FIR दाखल?

point

त्या कागदपत्रांची होणार कसून तपासणी

Ladki Bahin Yojana Latest News Update: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यात आतापर्यंत एकूण 17 हजार कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली आहे. या योजनेच्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जातील, असं आश्वास महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं.

ADVERTISEMENT

 या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, यामध्ये 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आहे.

हे ही वाचा >> Allu Arjun Arrest: संध्या थिएटरच्या घटनेला अल्लू अर्जुनच जबाबदार? 'त्या' लेटरने उडवली खळबळ!

राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 20 लाख 84 हजार अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनांचा लाभ मिळत असेल, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> LIC Bima Sakhi Yojana : विमा सखी योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र? लाडक्या बहिणींसाठी सविस्तर माहिती एका क्लिकवर

ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहने आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिलांच्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे, त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीय. तसच ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT