Mumbai : डब्यात घुसला, जबरदस्ती अन् धावत्या ट्रेनमधून महिलेला दिलं ढकलून
दादर रेल्वे स्टेशनवर एका 29 वर्षीय महिलेला चालत्या गाडीतून खाली फेकल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime news In Marathi : भरधाव एक्स्प्रेस रेल्वेमधून एका 29 वर्षीय महिलेला खाली ढकलून दिल्याची घटना घडली. रविवारी (6 ऑगस्ट) मुंबईतील दादर स्टेशनवर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अटक केली.
पुण्याहून मुंबई येणाऱ्या उदयान एक्स्प्रेसमधून 29 वर्षीय महिला प्रवास करत होती. उदयान एक्स्प्रेस दादर स्टेशनवर थांबली. गाडी सुटताना आरोपी महिलांच्या डब्यात शिरला. गाडी दादर स्टेशन सोडत असतानाच त्याने पीडित महिलेवर अचानक हल्ला केला.
वाचा >> Delhi Ordinance Bill: केजरीवालांना BJP कडून मोठा धक्का, पहिल्याच परीक्षेत ‘INDIA’ फेल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने महिलेचा विनयभंग केला. महिलेवर हल्ला करत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरोपीला विरोध केला. त्यानंतर आरोपीने धावत्या ट्रेनमधून महिलेला खाली ढकलून दिले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महिलेने पोलिसांना काय सांगितलं?
ही संतापजनक घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस जेव्हा दादर स्टेशनवर आली, तेव्हा महिला डब्यातून सर्वच महिला उतरल्या. पूर्ण बोगीत एकच महिला असल्याचे बघून आरोपी गाडीत शिरला. त्यानंतर त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
वाचा >> ‘आपके आँखो की शरम तक आपने बेची है..’, संजय राऊत राज्यसभेत का भडकले?
महिलेने सांगितल्याप्रमाणे विरोध केल्यानंतर आरोपीने ट्रेनमधून ढकलून दिले. सुदैवाने जेव्हा आरोपीने महिलेला खाली ढकलले, तेव्हा गाडी सुटली होती, पण स्टेशन सोडलेले नव्हते. त्यामुळे महिला प्लॅटफॉर्मवर पडली आणि जखमी होऊन बेशुद्ध झाली.
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आरोपीला ठोकल्या बेड्या
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या. आरोपी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
ADVERTISEMENT
वाचा >> Ajit Pawar भाजपसोबत हा अमित शाहांचा प्लॅन? एका वाक्याने मोठा खुलासा
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मद्यपान केलेले होते. आरोपीला विरोध केल्यानंतर त्याने महिलेला खाली ढकलून दिले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी भादंवि कलम 307, 394, 354, 150(1)(E), 153, 137, 147, 162 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT