4 वर्षाच्या मुलाचा आईनेच चिरला गळा, CEO सूचना सेठने केलेल्या हत्येची Inside Story
सूचना सेठ हे नाव सोशल मीडियावर काही नवं नाही. यशाला गवसणी घालणाऱ्या सूचना सेठने मात्र यावेळी अनेकांना धक्का दिला आहे. कारण काय तर घटस्फोट घेतलेला नवरा मुलाला भेटायला येतो म्हणून तिने सरळ मुलाची गळा चिरूनच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Goa Murder : सूचना सेठ हे नाव सोशल मीडियाला काही नवं नाही. कारण तिने अशा यशाला गवसणी घातली आहे की, तिच्या त्या यशामुळे आणि सोशल मीडियामुळे (Social Media) ती साऱ्या जगाला माहिती झाली आहे. मात्र आता हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते काही कोणत्याही यशस्वी गोष्टीमुळे नाही तर एका गंभीर गुन्ह्यामुळं तिचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. कारण सूचना सेठ (Suchana Seth) या 39 वर्षाच्या महिलेनं तिच्या चार वर्षाच्या मुलाची (Son) निर्घृणपणे हत्या (Murder) केली आहे. मात्र तिने ती हत्या का केली त्याची कारणं समोर आली त्यावेळी मात्र अनेकांना त्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
सूचना सेठ यशस्वी CEO
सूचना सेठ एक यशस्वी सीईओ, एक यशस्वी टेक्नो आणि यशस्वी उद्योजकही. ती बेंगळुरूमधील स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ आहे. मात्र सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे कारण तिच्यावर सध्या तिच्याच चार वर्षाच्या मुलाची तिने हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे. त्यानंतर मुलाचा मृतदेह बॅगेत ठेवून तिने पळ काढला होता. मात्र तरीही तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच घटनेचा हा सारा वृत्तांत…
न्यायालयाच्या निर्णयानं नाराज
सूचना सेठचं लग्न 2010 मध्ये झालं होते, ती मुळची पश्मिम बंगालची, मात्र तिचा नवरा हा केरळचा होता. लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगा झाला. मात्र 2020 मध्ये त्या पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली, आणि त्यांचे ते प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला, मात्र त्यावेळी न्यायालयाने हाही निर्णय दिला की, वडील त्याच्या मुलाला दर रविवारी त्याला भेटू शकतात. न्यायालयाचा हाच निर्णय तिला पटला नाही. त्या न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे ती प्रचंड नाराज आणि तणावात राहू लागली. तिला अजिबात असं वाटत नव्हतं की, तिच्या नवऱ्याने तिच्या त्या मुलाला भेटावं.
निवडलेला पर्याय भयंकर
न्यायालयाने नवरा बायकोला घटस्फोट दिला तरी बापाच्या मायेनं त्यालाही आपल्या मुलाला भेटावं हे वाटत होतच. मात्र त्यावर सूचना सेठने एक पर्याय शोधला. मात्र तो पर्याय इतका भयनाक असेल असं कोणाच्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हतं. सूचना सेठने ठरवल्याप्रमाणे ती मुलाला घेऊन गोव्याला गेली. त्यावेळी त्या लहान मुलाला तिने सांगितले की, चल तुला गोव्याची सफर घडवून आणतो. त्यामुळे तिचा मुलगाही आनंदाने नाचू लागला. गोव्यात पोहचल्यावर मात्र तिने एक हॉटेल बूक केले आणि ती दोघं तिथं राहिली.
हे ही वाचा >> Mla Disqualification: निकालाआधी ठाकरेंचा नवा डाव, नार्वेकरांना आता ‘असं’ गाठलं खिंडीत
रक्ताचे दिसले डाग
गोव्यात हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर तिने एका धारदार शस्त्राने स्वतःच्या मुलाचा गळा चिरला, जो फक्त चार वर्षाचा होता. त्यानंतर मुलाचे प्रेत तिने बॅगेत भरले. हॉटेलमध्ये पडलेला रक्ताचा सडा तिने स्वतःच साफ केला. कारण तिला वाटायचे की मुलाला मारल्याचा संशय कोणालाच येऊ नये. मात्र ज्यावेळी तिने हॉटेलमधून चेक आऊट केले होते, त्यावेळी हॉटेल स्टाफने विचारले की, मॅडम तुमचा मुलगा कुठे आहे. त्यावेळी तिने इतके बिनधास्तपणे सांगितले की, माझ्या मुलाला मी आधीच पुढं पाठवलं आहे. तुम्ही फक्त माझं चेकआऊट करा असं ती त्या हॉटेल कर्मचाऱ्यांना म्हणू लागली.
ADVERTISEMENT
हॉटेलवाल्यांचा संशय
तिने बिनधास्तपणे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सांगितले असले तरी हॉटेलवाल्यांना तिच्यावर संशय येऊ लागला. त्यानंतर हॉटेलमध्ये एक कार आली जी सूचना सेठने बूक केली होती. त्या कारमध्ये तिने आपले साहित्य भरले आणि ती निघून गेली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिल्यावर मात्र त्यांना मोठा धक्काच बसला. तिने तिची रूम स्वच्छ केली होती, मात्र तरीही कुठे कुठे रक्ताचे डाग पडले होते. त्यामुळे हॉटेल स्टाफ नंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
ADVERTISEMENT
कार थेट पोलिसात
हॉटेलवाल्यांना जो संशय होता तो त्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर मात्र गोवा पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सूचना सेठने ज्या कारवाल्याला बोलवलं होतं त्याचा फोन नंबर पोलिसांनी प्रयत्न करून मिळवला, त्यानंतर त्याला फोनही केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला फोन केला आणि सांगितले की, ज्या मॅडमनी तुझी कार भाडोत्री घेतली आहे. त्या तुझ्याच कारमध्ये आहेत का. त्यावर त्याने खरी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, तिथे जे जवळ पोलीस स्टेशन असेल तिथं तुझी कार घेऊन जा. पोलिसांच्या आदेशाप्रमाणे ड्रायव्हरनेही कार पोलीस स्थानकात दाखल केली. तिथे त्या महिलेला त्याने पोलिसांसमोर हजर केले आणि सूचना सेठला पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्या पोलीस स्थानकात कार घेऊन गेला होता, ते पोलीस स्थानक कर्नाटकातील चित्रदुर्गमधील होते. कर्नाटकातील पोलिसांनी ती माहिती गोवा पोलिसांना दिली आणि नंतर मग तिथे ते हजर झाले आणि सूचना सेठला अटक केली.
बाळाच्या हत्येचा घटनाक्रम
सूचना सेठला अटक केल्यानंतर मात्र तिने जेव्हा घटनाक्रम सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र पोलिसांना मोठा धक्काच बसला. सुचनाने सांगितले की, घटस्फोटानंतर तिला वाटायचे की आपल्या मुलाला तिच्या नवऱ्याने भेटू नये. मात्र न्यायालयाचा आदेश असल्यामुळे ती त्याला अडवू शकत नव्हती. त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला की, थेट आपल्या मुलालाच संपवायचे. त्यामुळे मग घटस्फोट घेतलेला नवरा पुन्हा इकडे कधीच येणार नाही. यावेळी तिने हत्येचा घटनाक्रम सांगताना ती म्हणाली की, मी माझ्या मुलाला हॉटेलमध्येच संपवले होते.
हे ही वाचा >>Viral News: भलताच पुरूष होता 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीला समजलं पत्नी तर…
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT