Alibaug: 57 वर्षाच्या पती-पत्नीचे भलतेच कारनामे, पोलिसांनी टप्प्यात कार्यक्रम करून टाकला!
Alibaug Crime: अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पती-पत्नी वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापा मारून जोडप्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हॉटेलमध्ये पती-पत्नी चालवत होते वेश्या व्यवसाय
बनावट ग्राहक बनून पोलिसांनी हॉटेलवर मारला छापा
आरोपी पती-पत्नीला केली अटक
Alibaug Sex Racket: अलिबाग: रायगड येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये पती-पत्नी वेश्याव्यवसाय चालवत होते. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालक जोडप्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चेंदहरे परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलची तपासणी केली.
हे ही वाचा>> Honeymoon ला जाण्यावरून वाद, कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर Acid हल्ला
तपासादरम्यान हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी तीन महिला या बेकायदेशीर कामात गुंतलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हॉटेल मालक ज्याचं वय 57 आहे. त्याला आणि त्याच्या पत्नीला अटक केली.
पोलिसांनी हॉटेल मालक दाम्पत्याविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. महिलांना या बेकायदेशीर कृत्यातून मुक्त करून त्यांचे संरक्षण व पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Mumbai Crime News : वासनांध प्रवाशनं थेट टॅक्सीमध्येच महिलेसमोर सुरू केलं... ग्रँट रोड परिसरातील चीड आणणारी घटना
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिसरातील इतर हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसवर पाळत वाढवली आहे. वेश्या व्यवसायासारख्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही कामाची माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT