सासूने दिले रॉडने चटके, सासऱ्याने सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड
Crime News: सासू आणि सासऱ्यांनी आपल्या सुनेवर अत्यंत अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही मध्यप्रदेशमध्ये उघड झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सासू आणि सासऱ्यांचे सुनेवर अमानुष अत्याचार
सुनेचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचा संशय
संपूर्ण कुटुंबाने केले सुनेवर शारीरिक अत्याचार
राजगढ (मध्य प्रदेश): सासरच्या मंडळींनी सुनेवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील शाहपुरा गावात घडली आहे. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, 13 डिसेंबरच्या रात्री गावातील तरुण रोहित रुहेला हा तिच्या घरी आला आणि स्टीम मशीन मागण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करू लागला. (mother in law burnt daughter in law with hot iron father in law put chilli in her private part cruelty crossed all limits in in laws house)
ADVERTISEMENT
दरम्यान, महिलेच्या वहिनीने त्या तरुणाला तिच्या जवळ पाहिले. यानंतर सासरच्या लोकांनी महिलेवर आरोप करत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, सासू, सासरे, पती आणि वहिनी यांनी मिळून तिचे कपडे काढले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
हे ही वाचा>> Alibaug: 57 वर्षाच्या पती-पत्नीचे भलतेच कारनामे, पोलिसांनी टप्प्यात कार्यक्रम करून टाकला!
सासरच्यांनी सुनेचा अमानुष छळ केला
एवढेच नाही तर सासूने गरम लोखंडी रॉडने तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीवर चटके दिले, तर अमानुषतेचा कळस म्हणजे पीडित महिलेच्या सासऱ्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये थेट मिरची पावडर टाकली. हे सगळे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी महिलेला रात्रभर नग्न करून तुफान मारहाण केली.
14 डिसेंबर रोजी पती आणि सासरच्यांनी बेशुद्ध अवस्थे महिलेला मोटार सायकलवर बसून तिला तिच्या माहेरी नेलं आणि तिच्या घरासमोर फेकून देत तिथून पळ काढला. दरम्यान, स्थानिक लोकांनी पीडितेच्या पालकांना तिच्याबद्दल माहिती दिली. पीडितेच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले आणि 15 डिसेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा>> Kalyan Marathi Family: 'मराठी लोक भिकारडे...', परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला हिणवत तुफान मारहाण
पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध केला गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कलम 115 (2), 118 (1), 74,64,3 (5) अंतर्गत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पीडित मुलगी खूपच घाबरली आहे. सध्या पोलिसांकडून पीडित तरुणीचे समुपदेशन केले जात आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT