Beed News : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! पोस्टमार्टम रिपोर्टने प्रशासनाची उडवली झोप
Beed Santosh Deshmukh Murder Case: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा आहे. या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
देशमुख्यांचया पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
पोलिसांनी केली 4 आरोपींना अटक
Beed Santosh Deshmukh Postmortem Report: बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा आहे. या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशातच देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसच देशमुखांच्या मृत्यूचं कारणही समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
देशमुख यांचे डोळे लायटरने फोडण्यात आले की नाही? याबद्दल डॉक्टरांनी माहिती दिली नाहीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल सीआयडीकडे जमा करण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाला, शॉकमध्ये गेल्याने मृत्यू देशमुख यांचा मृत्यू झाला होता. एकूण ८ पाणाचा हा अहवाल आहे. सर्व अवयव छाती, हात, पाय, चेहरा, डोके याला जबर मार लागला आहे. देशमुख यांच्या चेहऱ्यावर मार लागला आहे. डोळे काळे निळे झाले आहे. मात्र डोळे जाळण्याच्या प्रकाराला राज्यजिल्हाशल्य आणि आरोग्य विभाने दुजोरा दिला नाही. एकूण ३ डॉक्टरांच्या टीमने देशमुख यांचं शवविच्छेदन केलं आहे.
हे ही वाचा >> Gateway of India Boat Accident: 'स्पीड बोट चालक तर स्टंटच...', 'तो' Video शूट करणाऱ्या तरुणाने सगळंच सांगितलं!
संतोष देशमुखांना केली होती अमानुषपणे मारहाण
दरम्यान, मारहाण करणाऱ्या तरुणांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली. संतोष यांच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक नाही. शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ उमटले आहेत. फायटरने मारहाण केली, लायटरने डोळ्याला चटके दिले असल्याचं सांगितलं जात आहे.
4 आरोपींना अटक
मस्साजोग प्रकरणात आधी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी चार आरोपी फरार आहे. याच प्रकरणात आज आरोपी विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 4 वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी आहे. या प्रकरणात विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचे निलंबन करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 19 November Gold Rate: बाईईई! हा काय प्रकार; सोन्याच्या दरात पुन्हा झळाळी, मुंबईत आजचा भाव काय?
तसंच वाल्मिक कराड याच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगकडे निघाले होते. रस्त्यात टोल नाक्याजवळ एक काळया रंगाची स्कार्पिओ त्यांच्या कारचा पाठलाग करत होती. टोलनाका परिसरातच त्यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर त्यांचा अपहरण करण्यात आलं. अमानुष मारहाणीत त्यांचा अखेर मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्या कारचा पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT