भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

alibag crime news brother killed her two sister with poison property dispute
alibag crime news brother killed her two sister with poison property dispute
social share
google news

Alibag Crime : अलिबाग तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सख्ख्या भावानेच आपल्या दोन सख्ख्या बहिणींची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश शंकर मोहित असे या आरोपी भावाचे नाव आहे. भाऊ गणेशने सख्ख्या बहिणींना औषधमिश्रीत सूप खाण्यास देऊन त्याचा जीव घेतला आहे. अलिबाग (Alibag) तालुक्यातील चौल भोवाळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे. (alibag-crime-news-brother-killed-her-two-sister-with-poison-property-dispute)

ADVERTISEMENT

आरोपी गणेश मोहिते याचे वडील शंकर मोहिते वनविभागात कामाला होते. या दरम्यान काम करत असताना 2009 साली त्यांचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर गणेशने बहिणींकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवली होती. त्यानंतर गणेश इतक्यावरच थांबला नाही तर त्याने राहते घरही स्वत:च्या नावावर करून घेतले होते.

हे ही वाचा : Manoj Jarange : ‘…तोपर्यंत आम्ही फाशी घ्यायची का?’, गिरीश महाजनांना जरांगेंचा संतप्त सवाल

गणेशने वडिलांची नोकरी मिळवून घर देखील आपल्या नावे केल्याने दोन्ही बहिणींनी त्याच्याकडे हिश्श्याची मागणी करायला सुरूवता केली होती. गणेशच्या दोन्हीही बहिणी त्याच्याकडे सतत हिश्श्याची मागणी करत होत्या. या सततच्या मागणीला कंटाळून गणेशने सख्ख्या बहिणींची हत्या करण्याचा कट रचला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानुसार गणेशने त्या दिवशी आपल्या दोन्ही बहिणींना उंदीर मारण्याचे विषारी औषधमिश्रीत सूप प्यायला दिले. हे सूप प्यायल्यानंतर सोनालीला त्रास होत असल्याने अलिबाग जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान 16 ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला. यानंतर स्नेहललाही उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तिलाही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिचा देखील उपचारा दरम्यान 20 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता.

दरम्यान दोन्ही बहिणींच्या मृत्यूनंतर पोलिसांना या घटनेत संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करायला सूरूवात केली. या तपासा दरम्यान गणेशच्या एका बहिणीच्या बॅगेतून पोलिसांच्या हाती काही कागदपत्रे लागली होती. या कागदपत्रावरून त्यांच्यात प्रॉपर्टी आणि अनुकंपा नोकरीवरून वाद सुरु असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी गणेशला पोलिसी खाक्या दाखवताच बहिणींच्या हत्येची कबूली दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : …तर मी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात टाकेन -प्रकाश आंबेडकर

या घटनेत गणेशच्या वर्तवणूकीवरून पोलिसांना आधीच संशय बळावला होता. त्यातच गणेशने गुगलवर विषप्रयोग हे 53 वेळा सर्च केले आहे. यामध्ये कोणते औषध अन्नातून आणि पाण्यातून दिल्यानंतर वास येत नाही, हे सर्च करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT