Honeymoon च्या आधी नवरीने दिल्या प्रचंड शिव्या, नेमकं घडलं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Viral News: मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये नववधू ही माहेरकडील मंडळींचा निरोप घेऊन सासरी पोहोचताच प्रचंड गोंधळ सुरू झाला. ही बातमी सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. नुकतंच लग्न होऊन आपल्या सासरी पोहचलेल्या नववधू घरात काही वेळाने एकच गोंधळ घातला. त्यावेळी ती प्रचंड विचित्र वागू लागली होती. काही काळ ती पदर डोक्यावर घेऊनच घरात वावरत होती. पण नंतर पतीने डोक्यावरुन पदर बाजूला करताच तिच्या तोंडून अत्यंत अश्लाघ्य अशा शिव्या निघू लागल्या. (after marriage bride showered abuses by opening the veil the whole reason will surprise you viral video )

ADVERTISEMENT

त्यावेळी तिच्यासमोर नवरा, सासू, सासरे हे सगळे होते. पण कोणाचाही मुलाहिजा न राखता समोर येणाऱ्या प्रत्येकाला नववधू ही घाणेरड्या शिव्या देत होता. हा सगळा प्रकार ज्या पद्धतीने घडला त्यामुळे सासरकडील मंडळी ही अक्षरश: चक्रावून गेली. त्यानंतर जेव्हा सासरकडील मंडळींनी नववधूची माहिती घेतली असता ती बऱ्याच दिवसांपासून मानसिक त्रासात असल्याचे त्यांना समजले. मात्र, लग्नापूर्वी याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय.

मथुरेच्या वृंदावनमध्ये काय घडलं?

मथुरेतील वृंदावन येथून एक विचित्र घटना समोर आली असून, या घटनेची संपूर्ण परिसरात बरीच चर्चा आहे. गौरा नगर येथील आनंद अग्रवाल याचे लग्न हरियाणातील होडल येथे राहणाऱ्या लखन पाल मंगला यांची मुलगी रेखा हिच्यासोबत निश्चित झाले होते. हा विवाह 10 मे रोजी सांग्रसंगीतपणे आणि अगदी थाटामाटात पार पडला होता.

हे ही वाचा >> शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

11 मे रोजी सकाळी निरोप दिल्यानंतर नववधू ही आपल्या सासरी आली. पण त्यानंतर तिने घरात गोंधळ घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रेखा ही लग्नानंतर सासरी आली. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली. पण काही वेळाने ती बाहेर आली आणि गोंधळ घालू लागली. काही वेळातच नववधूचा गोंधळ एवढा वाढलेा की, सासरकडील मंडळींना पोलिसांना पाचारण करावं लागलं. .

रूममधून बाहेर येताच शिवीगाळ

दरम्यान, या घटनेची माहितीही वधूच्या कुटुंबीयांना देखील आता देण्यात आली आहे. पती आनंदने सांगितले की, पत्नी रेखा ही त्यांच्या रूममधून अचानकपणे बाहेर आली आणि बाहेर बसलेल्या कुटुंबीयांना शिवीगाळ करू लागली. तिला जणू वेडेपणाचे झटके येत होते. जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा पतीने मुलीच्या कुटुंबीयांवर सत्य लपवल्याचा आणि खोटे बोलल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >> गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ अन् अल्पवयीन मुलासह एकाला अटक

मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलीचे आपल्या मुलाशी खोटेपणाने लग्न लावून दिल्याचा आरोप अग्रवाल कुटुंबीयांनी केला आहे. वराने वधूच्या भावाला फोन करून या संपूर्ण घटना सांगितली. यानंतर नवरीच्या भावाने जी गोष्ट सांगितली त्यानंतर वराचे आणि त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. त्याने सांगितले की, त्याची बहीण ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. यावर आनंद यांनी पोलिसांना माहिती देत ​​दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणले. बराच वेळ याबाबत चर्चा झाल्यानंतर या प्रकरणी सामजस्यांने मार्ग काढण्याचे ठरविण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT