अतीक-अशरफला डोक्यात गोळ्या घातल्यानंतर का पळाले नाही हल्लेखोर?, सांगितलं ‘हे’ कारण
अतीक आणि अशरफ यांची हत्या केल्यानंतर आरोपींचा पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र, ते त्यांना शक्य झालं नाही.. याबाबतचं नेमकं कारण आरोपींनीच पोलिसांना सांगितल आहे.
ADVERTISEMENT
Atiq Ahmed Murder Case: गँगस्टर ते नेता बनलेला अतीक अहमद (वय 60 वर्ष) आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी चौकशीदरम्यान अनेक खुलासे पोलिसांसमोर केले आहेत. ‘अतीक आणि अशरफ टोळीचा खात्मा करून राज्यात आपल्याला माफिया व्हायचं होतं.’ असं तीनही आरोपींनी पोलिसांना आपल्या जबाबात सांगितलं आहे. (attackers could not run away after killing atiq ahemd and ashraf know the actual reason)
ADVERTISEMENT
हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. लवलेश तिवारी (रा. बांदा), मोहित उर्फ सनी (रा. हमीरपूर) आणि अरुण मौर्य (रा. कासगंज-एटा) यांच्यावर अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धुमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक (एसएचओ) राजेश कुमार मौर्य यांनी शाहगंज पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, चौकशीदरम्यान तीनही आरोपी म्हणाले, “आम्हाला अतीक आणि अश्रफ टोळीचा खात्मा करून राज्यात आमचे नाव प्रसिद्ध करायचे होते, ज्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. पोलिसांच्या गराड्याचा आम्हाला अंदाज आला नाही आणि त्यामुळेच आम्ही खून करून पळून जाऊ शकलो नाही. पोलिसांनी केलेल्या झटपट कारवाईत आम्ही अडकलो.”
हे ही वाचा>> डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटी राहणाऱ्या पतीने बायकोचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल
पोलिसांच्या एफआयआरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, या गोळीबारात लवलेशलाही गोळी लागली असून त्याच्यावर प्रयागराज येथील स्वरूप राणी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
अतीक आणि अशरफची नेमकी कशी करण्यात आली हत्या?
आरोपी अतीक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली होती. हा हल्ला झाला त्यावेळी दोघांना तपासणीसाठी नेले जात होते. पण तीन आरोपींनी केलेल्या बेछूट गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झालेला. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शीच्या मते, जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी जय श्री रामचा नारा देखील ऐकू आला होता.
हे ही वाचा>> Atiq Ahamad : सनी, लवलेश आणि अरुण; तिघांनी अतिक-अशरफची का केली हत्या?
प्रयागराजमधील कॉल्विन हॉस्पिटलजवळ पोलिसांचे पथक अतीक आणि अहमद यांना घेऊन जात असताना हा हल्ला झाला होता. तीन हल्लेखोर अचानक तिथे पोहोचले आणि त्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरून तात्काळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. हा संपूर्ण हल्ला मीडिया आणि पोलिसांसमोर करण्यात आला होता. दोघांवर गोळीबार झाला तेव्हाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.
ADVERTISEMENT
प्रयागराजमध्येच करण्यात आलेली उमेश पालची हत्या
उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षा कर्मचार्यांची 24 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. उमेश पाल हा प्रयागराज येथील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होता. उमेश गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. यादरम्यान गोळी लागल्याने त्यांचा आणि त्यांच्या एका सुरक्ष रक्षकाचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नराधमांनी अवघ्या 44 सेकंदात हे हत्याकांड घडवून आणले होते. या सगळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अतीक होता ज्याच्यावर या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. त्यामुळेच पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, आता पोलिसांच्या ताब्यात असतानाही दोघांची हत्या झाल्याने यूपी सरकार आणि पोलीस प्रशासन यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT