मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bhandup girl kidnaped and went to azamgarh love zihad case in mumbai bjp kirit somaiya allegation
bhandup girl kidnaped and went to azamgarh love zihad case in mumbai bjp kirit somaiya allegation
social share
google news

देशभरातून लव्ह जिहादच्या (Love Zihad) घटना समोर येत असताना आता मुंबईत लव्ह जिहाद घडल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला आझमगडला (Azamgarh) नेण्यात आल्याची घटना घडली आहे. आझमगड नेऊन तिला घरात डांबून ठेवून तिचा शारीरिक छळ करण्यात आला होता. तरूणीच्या घरानजीकच सलून चालवणाऱ्या एका मुस्लीम भावांनी तिला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आलाय. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पत्रकार परीषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. (bhandup girl kidnaped and went to azamgarh love zihad case in mumbai bjp kirit somaiya allegation)

ADVERTISEMENT

प्रकरण काय?

भांडूपमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 8 मे रोजी अपहरण करण्यात आले होते. घरानजीक असलेल्या सलूनवाल्या मुलाने तिचे अपहरण केले होते. हे सलून मोहम्मद चालवायचा.तर त्याच्यासोबत त्याचा भाऊ सैफ खान देखील होता. या सैफ खानने मुलीला फुस लावून आझमगडला पळवले होते. या तरूणीला पळवून नेत तिला पाच दिवस एका खोलीत बंद केले होते. तिचा मोबाईलही हिसकावण्यात आला होता. या खोलीत तिच्यावर छेडखानी आणि शारीरीक छळ देखील करण्यात आला होता, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा : Crime : चुकीचे इंजेक्शन अन् संशयास्पद मृत्यु, तरूणीसोबत नेमकं काय घडलं?

दरम्यान या प्रकरणी मुलीचे वडिल किसन बडेला यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सूरू केला होता. मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केल्याचे कळताच आरोपींचे धाबे दणाणले होते. त्यामुळे आरोपींनी मुलीद्वारे वडिलांना फोन लावून धमकावण्याचा प्रयत्न केला. ‘माझ लग्न झालंय एका मुलाशी, तुम्ही मला विसरून जा’, असे आरोपींनी मुलीली बोलण्यास भाग पाडले.त्याचसोबत पोलिसात दाखल केलेली तक्रार देखील मागे घेण्यास सांगितले होते. मात्र वडिलांनी या धमकीला भीक न घातला पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

हे वाचलं का?

पोलिसांनी सायबर सेलच्या माध्यामातून आझमगडवरून आलेला हा फोन ट्रेस केला होता. याद्वारे घटनास्थळाचा पत्ता मिळवून मुलीची सुटका केली होती. याप्रकरणी आता आरोपी सैफ खानला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे. या प्रकरणात आरोपींच्या नातेवाईकांवर कारवाई का केली नाही, असा सवाल देखील सोमय्या यांनी उपस्थित केला. यासोबतच या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

हे ही वाचा : Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT