Bhiwandi: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा कटरने गळा चिरला, अन् आरोपीने…
भिवंडीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने प्रेयसीचा गळा कटरने चिरून तो पश्चिम बंगालला फरार झाला होता. मात्र भिवंडी पोलिसांनी त्याचा तपास करत पश्चिम बंगालमधून त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Bhiwandi Murder : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच संशयावरून आणि अनैतिक संबंधाच्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हत्या घडल्या असल्याचेही पोलिसांनी सांगितेल. या प्रकारातून भिवंडीतही एका महिलेचा गळा चिरुन हत्या (Murder) करण्यात आली होती. महिलेची हत्या करुन आरोपी पश्चिम बंगालमधील आपल्या गावाकडे पळून गेला होता. मात्र त्याचा शोध घेत पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीला पश्चिम बंगालमधून (West Bengal) अटक केली. ही हत्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहत असताना चारित्र्यावर संशय घेऊन केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. (bhiwandi lover in live-in relationship slashed throat cutter accused absconded to west bengal)
ADVERTISEMENT
ओळखीचे रुपांतर प्रेमात
भिवंडीमधील कोनगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून मधू प्रजापती ही आपला प्रियकर शब्बीर दिलावर शेख (वय 32) याच्याबरोबर राहत होती. मधू ही नवऱ्यापासून विभक्त राहत होती. त्यानंतर ती एका कंपनीतही नोकरी करत होती. त्यावेळी तिची ओळख शब्बीर दिलावर शेख बरोब झाली होती. काही दिवसांनी त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती दोघं भाडोत्री रुम घेऊन भिवंडीतील कोनगावमधील गणेशनगरमध्ये राहत होती. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर शब्बीर शेख हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरुनच त्यांची अनेकदा वाद होत होते.
हे ही वाचा >> आमदार अपात्रतेबाबतच्या हालचालींना वेग, राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत
लिव्ह इन रिलेशन आणि संशय
शब्बीर आणि मधू ही दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असतानाच त्यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. शब्बीर हा तिच्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये खटकेही उडत होते. त्यावरुनच 15 सप्टेंबर रोजी त्या दोघांचे वाद झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, शब्बीरने रागाच्या भरात धारदार कटरने मधूचा गळा चिरला व तिच्या दोन्ही हाताच्या नसाही कापल्या. त्यानंतर तिचा मृतदेह त्याने तसाच त्या खोलीत टाकून तो पश्चिम बंगालला फरार झाला होता.
हे वाचलं का?
खोलीतून दुर्गंधी सुटली
शब्बीरने मधूची हत्या करुन खोलीतच मृतदेह टाकून गेल्यामुळे काही दिवसांनी खोलीतून दुर्गंधी सुटली. त्यानंतर शेजाऱ्याच्यांनी कोनगाव पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोलीचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी गळा चिरलेल्या अवस्थेत मधूचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तो मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.
मैत्रिणीने दिली फिर्याद
मधू प्रजापतीची हत्या झाल्यानंतर तिची मैत्रीण अनिता शर्मा यांनी शब्बीर शेख याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या दोघांसोबतच आणखी एक महिला आणि पुरुषही राहत असल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. शब्बीर राहत असलेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> क्रुरतेचा कळस गाठणाऱ्याचा एन्काऊंटर, ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची केली होती हत्या
पोलिसांचे वेषांतर
मधू आणि शब्बीरचा जेव्हा वाद झाला होता. त्या दिवशी शब्बीरच्या हातालाही मार लागला होता. त्यामुळे तो गावी फरार झाल्यानंतर दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. त्यावेळी पोलिसांनी वेषांतर करुन त्याच्या सासरवाडीला पोलीस पोहचले होते. तो रुग्णालयात पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी कोनगाव पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT