Kalyan Crime: तरुणासोबत लॉजवर गेलेल्या महिलेसोबत घडलं भयंकर, सापडला थेट..

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Body of woman found in Tripti Lodge near station in Kalyan, accused absconding
Body of woman found in Tripti Lodge near station in Kalyan, accused absconding
social share
google news

Murder Case : कल्याण शहरात दुहेरी हत्याकांड होऊन 10 दिवस उलटण्यापूर्वीत आता पुन्हा एकदा महिलेच्या हत्येमुळे कल्याण हादरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील तृप्ती लॉजच्या (Trupti Lodge) खोलीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लॉजवर हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव ज्योती तोरडमल असल्याचे पोलिसांनी (Kalyan News) सांगितले. मृत महिला शनिवारी दुपारी एका व्यक्तीसोबत लॉजवर आली होती. तर महिलेसोबत असलेला भूपेंद्र गिरी हा व्यक्ती फरार झाला आहे. ज्योती तोरडमल महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

उशिरापर्यंत खोली बंदच

स्टेशन परिसरातील लॉजवरच महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून त्या महिलेची हत्या का करण्यात आली त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्योती तोरडमल ही महिला घाटकोपर परिसरात राहत होती. भूपेंद्र गिरीसोबत ज्योती तोरडमल शनिवार दुपारी लॉजवर आली होती. मात्र रविवारी सकाळी त्या दोघांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे लॉजच्या कर्मचाऱ्यांनीच खोलीचा दरवाज उघडला, त्यावेळी ज्योती तोरडमल या महिलेचा मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा >> Article 370 Verdict : “निवडणुकीपूर्वी पाकव्याप्त काश्मीर…”, ठाकरेंनी केलं निर्णयाचं स्वागत

दरवाजा उघडताच दिसला मृतदेह

लॉजच्या खोलीत ज्योती तोरडमलचा मृतदेह आढळून येताच कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करून मृतदेह ताब्यात घेतला, व त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे वाचलं का?

हत्या करून आरोपी फरार

ज्योती तोरडमलची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून भूपेंद्र गिरीचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या हत्याकांडाचा तपास सुरू आहे. ज्योती तोरडमल ज्याच्याबरोबर लॉजवर आली होती, तो भूपेंद्र गिरी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा >> MLA Disqualification Case : “उद्धव ठाकरेंनी ते निर्णय…”, सामंतांचा ऑक्टोबर 2019 मधील बैठकीबद्दल खुलासा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT