घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण, सत्य समोर येताच घडलं फारच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण
घरात नवरा-बायकोसारखे राहायचे चुलत भाऊ-बहीण
social share
google news

Boy killed his aunt : प्रेमप्रकरणाच्या दररोज अनेक घटना समोर येत असतात.या प्रकरणात अनेकांची लव्हस्टोरी पुर्ण होते,तर अनेकांची अपुर्णच राहते. मात्र या घटनेत तर भलतंच घडलंय. चुलत बहिण-भाऊ (brother-sister) एकमेकांच्या प्रेमात होते. या नात्याला पुढे नेण्यासाठी त्यांनी नंतर मंदिरात जाऊन लग्न देखील केले होते. मात्र याची कल्पना कोणालाच नव्हती. या नात्याची माहिती आईला कळताच तिने नात्याला विरोध दर्शवला.त्यामुळे नात्यात अडसर ठरत असलेल्या आईची मुलाने हत्या केली. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय.(boy killed his aunt in love with cousin sister bihar samastipura shocking incident)

ADVERTISEMENT

महिलेचा खुन

मोहिऊद्दीनगर पोलिस (police) ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना घडलीय. सोमवारी रात्री महिलेची (Women) निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती गावातील नागरीकांना लागताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाला ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी (Postemartam) पाठवले होते.यासोबत संशयाच्या आधारावर घरातीलच एका तरूणाला ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा : विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…

तरूणाचा धक्कादायक खुलासा

पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेताच चौकशीत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मावशीच्या मुलीसोबत तो प्रेम करायचा.तसेच तीन वर्षापासून ते नात्यात होते. दोघांनी मंदिरात जाऊन लग्न देखील केले होते आणि मावशीच्याच घरी नवरा-नवरी सारखे राहायचे. मावशीला या नात्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे तिने तिच्या मुलीला तिच्या बहिणीच्या घरी पाठवून दिले होते. त्यानंतर मावशीची मुलगी परत आल्यानंतर दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तरूणाने पोलिसांना दिली होती.

म्हणून हत्येचा कट रचला…

दरम्यान या सर्व प्रकारानंतर मावशीने मुलीला बाहेर पाठवण्याची तयारी केली होती. बायकोपासून दुर जाण्याची भिती आणि मावशीचा मनात राग ठेवून त्याने मावशीची हत्या करण्याचा डाव रचला होता. सोमवारी मावशी आणि तो एकटाच घरी होता.या संधीचा फायदा घेत त्याने महिलेची हातोडीने वार करून हत्या केली. या घटने नंतर तरूण आपल्या खोलीत जाऊन झोपून गेला होता. सकाळी उठल्यावर त्याने गाववाल्यांना या घटनेची माहिती दिली होती.त्यानंतर संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्यालाच उचलंल होतं.

हे ही वाचा : 19 वर्षीय तरुणीने बनवले भावा-बहिणीचे अश्लील फोटो; कारण…

आरोपी तरूणाचे (Boy) चुलत बहिणीसोबत प्रेम होते.या प्रेमाला मावशीचा विरोध होता.याच विरोधातून आरोपीने तिची हत्या केली, अशी माहिती एपी विनय तिवारी यांनी दिली. तसेच या घटनेत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घरातीलच तरूणच आरोपी असल्याचे पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. बिहारच्या समस्तीपुरामध्येही घटना घडलीय. या घटनेने संपुर्ण शहर हादरलंय.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT