अनेक वर्षांच्या प्रेमाचा भयानक अंत; प्रेयसीला दिलं पेटवून अन् स्वतःलाही संपवलं…
प्रियकराने प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूर : येथील मूलमधून एक भयानक घटना समोर येत आहे. प्रियकराने प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंडू उर्फ रामचंद्र निमगडे असे गळफास घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधांमुळे मयत आणि पत्नीमध्ये रोज भांडणे व्हायची. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गंभीर भाजलेल्या प्रेयसीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Boyfriend committing suicide by pouring petrol on his girlfriend and setting her on fire)
ADVERTISEMENT
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवासी बंडू उर्फ रामचंद्र निमगडे (45)याचे शेजारी राहणाऱ्या विवाहित मुस्लिम महिलेसोबत मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. याच प्रेमसंबंधांमुळे मयत बंडू आणि त्याची पत्नी यांच्यात दररोज भांडण होत असे. या तणावातून बंडूने प्रेयसीच्या घरी जाऊन तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, या घटनेनंतर , बंडूने पुन्हा घरी येऊन गळफास लावून आत्महत्या केली.
कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट
या घटनेत प्रेयसी 28 टक्के भाजली असून तिला मूल येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले होते. मात्र पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Crime : “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे” : मुलाने केलं प्रपोज; नकार देताच भररस्त्यात…
पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी सांगितले की, पेट्रोल टाकून पेटविल्याने महिला 28 टक्के भाजली आहे, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. ही घटना घडवणाऱ्या आरोपीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे, कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT