‘घरी एकटी असली की भाऊ करतो बलात्कार, आई म्हणते ‘गप्प रहा’; पीडितेची वेदनादायक कहाणी
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे धक्कादायक प्रकार समोर आलाय. भाऊ सख्ख्या बहिणीवरच बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT
Crime News in marathi : बहिणी भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आलीये. एका तरुणाने सख्ख्या बहिणीलाच वासनेची शिकार बनवले. पण, धक्कादायक प्रकार म्हणजे आईनेही भावाची बाजू घेत पीडित तरुणीला गप्प राहण्यास सांगितले. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी मुख्य संशयिताविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Brother raped his real sister)
ADVERTISEMENT
ही घटना आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील. आईने या घटनेची कुठेही वाच्यता न करण्यास सांगितले होते. पण, पीडितेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. फिर्यादीत म्हटलं आहे की, “माझा भाऊ बलात्कार करतो. तो करत असलेल्या या लैंगिक छळाला माझ्या आईची सहमती आहे. तिला परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. मात्र, तिने मला गप्प राहण्यास सांगितले आहे.” पीडितेनं पुढे म्हटलंय की, “जेव्हा मी घरी असते, तेव्हा एकटं पाहून भाऊ मारहाण करतो आणि बलात्कार करतो.”
‘आई म्हणते सर्व ठीक आहे, तू गप्प राहा”
पीडितेने पोलिसांना सगळी हकिकत सांगितली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, जेव्हा तिने तिच्या आईला या सगळ्या प्रकाराबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या आईने यावर विश्वास ठेवला नाही. उलट “बेटा, सर्व काही ठीक आहे. तू गप्प बस”, असं सांगितलं. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्याच्या आईची भूमिकाही तपासत आहेत.
हे वाचलं का?
वाचा >> Kalwa Hospital : 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? रुग्णालय प्रशासनाने सांगितली कारणे
“पीडितेच्या आईची होणार चौकशी”
याप्रकरणी एडीसीआयपी लखन सिंह यादव यांनी सांगितले की, पीडितेने तिच्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्याच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तिच्या आईच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.
10 वर्षाच्या मुलीवर करण्यात आला होता अत्याचार
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात कौटुंबिक नात्याला लाजवेल अशी एक घटना समोर आली होती. मावशीच्या घरी आलेल्या एका तरुणाने 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार केला होता. आरडाओरडा केल्यावर नातेवाईकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
ADVERTISEMENT
वाचा >> कोण आहे फरहीन फलक, जी ‘कराची टू नोएडा’ चित्रपटात दिसणार सीमा हैदरच्या भूमिकेत?
जिल्ह्यातील पाली भागातील एका गावात ही घटना घडली. शाहजहांपूर जिल्ह्यातील एका गावात राहणारा रामू त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. यावेळी तो त्याच्या चुलत भावासोबत खाटेवर झोपलेला आढळला आणि नंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT