Burari Rape Case : सैतानी कृत्ये! वडिलाचा मृत्यू… ‘मामा’ 4 महिने करत राहिला बलात्कार
दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागात सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांने 14 वर्षाच्या मुलीवर 4 महिने सतत बलात्कार केल्याची घटना घडलीये.
ADVERTISEMENT
वासना शरीराची असो वा पैशाची, ती माणसाला पशू बनवते. असा क्रूर जीव ज्याला नातं, विश्वास, देव आणि समाज यात काहीच दिसत नाही. तो फक्त सैतानी कृत्ये करत सुटतो आणि त्यातच त्याला आनंद मिळतो. आपल्यामुळे कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, हे त्याला समजतही नाही. कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जावी अशी क्रूर घटना राजधानी दिल्लीत घडलीये. जिथे एका अधिकाऱ्याच्या कृत्याने मानवतेला लाजवेल. आणि मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासली. या प्रकरणात पोलिसांनी परमोदय खाका आणि त्याची पत्नी सीमा राणीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
गोष्ट सुरू झाली 2020 मध्ये. हे ते वर्ष होते जेव्हा केवळ आपला देशच नाही तर संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीचा सामना करत होते. त्यावेळी पीडित मुलगी फक्त 14 वर्षांची होती. याच काळात ती अनेकदा तिच्या वडिलांसोबत बुरारी येथील चर्चमध्ये जात असे. जिथे तिच्या वडिलांनी मैत्री दिल्ली सरकारमध्ये एका अधिकाऱ्याशी झाली. बुरारीच्या चर्चमध्ये तो अनेकदा भेटत असे. त्या मुलीची आई त्या अधिकाऱ्याला भाऊ मानायची, त्यामुळे ती निरागस मुलगीही त्या व्यक्तीला मामा म्हणायची.
वडिलांच्या मृत्यूने आयुष्यच बदलले
लॉकडाऊन हटवण्यात आला, पण कोरोनाची भीती आणि कहर कायम होता. इतक्यात त्या मुलीच्या कुटुंबावर संकटांचा डोंगरच कोसळला. अचानक तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या मुलीचे वय अवघे 14 वर्षे होते. वडिलांच्या निधनाने तिची आई कोलमडून गेली. वडिलांच्या जाण्याने जणू काही त्याचं सगळं जगच संपलं होतं. काही दिवस आई आणि मुलगी प्रचंड शॉकमध्ये राहिले. मुलगी तर गप्पच राहायची. त्यामुळे आईला तिची काळजी वाटत होती.
हे वाचलं का?
मानलेल्या भाऊ म्हणाला माझ्या घरी ठेव
दरम्यान, मुलीच्या आईला तिच्या या मानलेल्या भावाने मुलीला त्याच्या घरी ठेवण्याची ऑफर दिली. मुलीच्या आईचा त्या व्यक्तीवर विश्वास होता. कारण तो अनेकदा चर्चला जात असे. तो तिच्या पतीचा मित्रही होता आणि तिला आपली बहीण मानत होता.
वाचा >> Crime: पोलीस पत्नीच्या गळ्यावरुन फिरवला चाकू, 2 वर्षाच्या चिमुकलीनेही रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
मुलीच्या आईकडे अशी अनेक कारणे होती की तिने त्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला. त्यानंतर ती आपल्या मुलीला त्याच्या घरी पाठवण्यास तयार झाली.
ADVERTISEMENT
1 ऑक्टोबर 2020
हा तो दिवस होता जेव्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या उपसंचालक पदावर असलेल्या आरोपी व्यक्तीने त्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी आणले. त्यांच्या घरात त्यांची पत्नी आणि संपूर्ण कुटुंब राहत होते. मुलगी तिथे राहू लागली आणि तिची आई कामानिमित्त दूर राहायची. दोघेही बोलायचे. मुलगी तिच्या मामाच्या घरी राहत होती पण तरीही ती नाराज होती. कदाचित तिला तिच्या वडिलांची आठवण येत असावी, असं तिच्या आईला वाटायचं. नंतर 4 महिने निघून गेले.
ADVERTISEMENT
जानेवारी 2021 मध्ये अल्पवयीन मुलगी तिच्या आईकडे आली
चार महिन्यांत मुलीने तिच्या आईला अनेकदा तिच्याकडे येण्यास सांगितले. यादरम्यान तिची प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे मुलगी जानेवारी 2021 मध्येच तिच्या आईकडे परत आली. तिच्या आईच्या लक्षात आले की पीडित मुलगी खूप शांत झालीये आणि बदलली आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर महिलेला मुलीची चिंता वाटू लागली. तिला पॅनिक अटॅक येऊ लागले. मुलीची अवस्था पाहून आई अस्वस्थ झाली. यानंतर ती आपल्या अल्पवयीन मुलीसह रुग्णालयात पोहोचली आणि डॉक्टरांनी तिला तेथे दाखल केले.
समुपदेशनादरम्यान तरुणीने केला मोठा खुलासा
मुलीला अशा अवस्थेत पाहून तिची आई खूप अस्वस्थ झाली. तिला समजले नाही की चार महिन्यात तिच्या मुलीसोबत काय झाले? रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला उपचारासोबतच समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. कारण तिला मानसिक त्रास असावा, हे डॉक्टरांना समजले होते. जेव्हा त्या मुलीचे समुपदेशन सत्र सुरू होते, त्यादरम्यान अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून समुपदेशक आणि डॉक्टरही चक्रावून गेले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
वाचा >> Sana Khan Murder : सना, सेक्स्टॉर्शन आणि ग्राहकांसोबत संबंध; पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार
त्या मुलीने काय खुलासा केला होता? तिला काय झाले? असा काय प्रकार त्या अल्पवयीन मुलीने समुपदेशक आणि डॉक्टरांना सांगितला की त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला? खरंतर त्या निरागस मुलीसोबत असं काही घडलं होतं, ज्याची कल्पना तिच्या आईने आणि तिने स्वप्नातही केली नसेल. त्या मुलीवर सतत बलात्कार झाला.
गर्भपातही झाला
खरे तर ज्याने त्या निष्पाप मुलीवर हे अत्याचार केले तो दुसरा कुणी नव्हता तर ज्याला ती मामा म्हणायची, तोच होता. त्यांच्या घरी ती मुलगी 4 महिने राहिली होती. एवढेच नाही तर पीडिता गर्भवती राहिल्यावर तिने उपसंचालकांच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली होती, मात्र आरोपीच्या पत्नीने तिला बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आणि नंतर तिच्या मुलाकडून औषध मागवून तिला खाऊ घातले आणि तिचा गर्भपात केला.
आयपीसी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीविरुद्ध आयपीसी आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी IPC कलम 376(2), 506, 509, 323, 313, 120B, 34 IPC आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अधिकारी निलंबित
दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागात सेवेत असलेल्या उपसंचालकाचा हा हातखंडा समोर आल्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी उपसंचालकाच्या घरी पोहोचले होते. दिल्ली पोलिसांनी निलंबित उपसंचालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी रविवारी माहिती दिली
दिल्ली पोलिसांनी रविवारी सांगितले होते की, दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भधारणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 1 ऑक्टोबर 2020 पासून दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या उपसंचालकांच्या घरी राहत होती.
वाचा >> Chandrayaan 3 : पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे? जाणून घ्या 7 रंजक गोष्टी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकाऱ्याने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान मुलीवर अनेकदा बलात्कार केला. तक्रारीत अधिकाऱ्याच्या पत्नीने गर्भपातासाठी औषधे दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पीडितेला रुग्णालयात करण्यात आले दाखल
पीडित मुलगी सिव्हिल लाईन्स परिसरातील एका शाळेतील बारावीची विद्यार्थिनी आहे. सध्या ती रुग्णालयात दाखल आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापपर्यंत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकरणाचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.
पीडितेला अद्याप जबाब देता आलेला नाही
उत्तर दिल्ली जिल्ह्याचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुरारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय मुलीच्या वडिलांचे ऑक्टोबर 2020 मध्ये निधन झाले. मुलीला नंतर तिच्या मृत वडिलांच्या मित्राच्या म्हणजे पदमोदय खाकाच्या घरी पाठवण्यात आले, जो आता या प्रकरणात आरोपी आहे.
तिने सांगितले की नोव्हेंबर-डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये आरोपीने (दिल्ली सरकारी अधिकारी) तिच्यावर बलात्कार केला. ही बाब तिने आरोपीच्या पत्नीला सांगितल्यावर महिलेने तिला धमकावत तिचा गर्भपातही करून घेतला. मुलगी तणाव आणि दबावाखाली राहिली. या घटनेनंतर तिला पॅनिक अॅटॅकही येऊ लागले. ही बाब तिच्या उपचारादरम्यान उघडकीस आली. डॉक्टरांनी सांगितले की, मुलगी जबाब देण्याच्या स्थितीत नाही.
दिल्ली पोलिसांना नोटीस
स्वाती मालीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘दिल्लीतील महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक पदावर बसलेल्या एका सरकारी अधिकाऱ्यावर एका मुलीच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप झाला आहे. पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही. दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. ज्याचे काम मुलींचे रक्षण करणे होते, तो जर शिकारी बनला तर मुली कुठे जातील? लवकरच अटक झाली पाहिजे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT