क्रूरतेची हद्द! घरात घुसून सामूहिक बलात्कार, अंगावर दिले सिगारेटचे चटके

मुंबई तक

ADVERTISEMENT

businessman wife gang-raped robbery Bijnor Uttar Pradesh woman body burned with cigarettes
businessman wife gang-raped robbery Bijnor Uttar Pradesh woman body burned with cigarettes
social share
google news

UP Gang Rape:  उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये (Bijnor in Uttar Pradesh) चोरट्यांनी दरोडा घालत क्रूरतेची हद्द गाठली आहे. दरोडा टाकत नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करुन महिलेच्या शरीराला सिगारेटचे चटके दिले आहेत. घरात दरोडा (robbery) टाकत चोरट्यांनी घरातून 25 तोळे सोने, 2 किलो चांदी, दीड लाख रुपयांची रोकड, स्कूटर, एलईडी टीव्ही, मोबाइल व आणि इतर साहित्य लंपास केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करताना पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने स्पष्टीकरण  मागमविण्यात आले आहे. (businessman wife gang-raped robbery Bijnor Uttar Pradesh woman body burned with cigarettes)

ADVERTISEMENT

पोलिसांचा हलगर्जीपणा

ज्या परिसरात घटना घडली त्या हद्दीतील पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याने आता पोलीस अधीक्षकांनी त्यामध्ये लक्ष घालून गुन्हा नोंद केला आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथकांची नेमणूक करत पोलीस तपासाला सुरुवात केली आहे.

याआधीही घरात दरोडा

ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारण एका व्यापाऱ्याबरोबर घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. 19 ऑक्टोबरलाही त्यांच्यासोबत अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी चोरट्यांनी  व्यापाऱ्याच्या कुटुंबाला वेठीस धरुन 80 हजार रुपयांची लूट केली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र काल पुन्हा हा प्रकार घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> धक्कादायक! दारुच्या नशेत तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला

…अन् सामुहिक बलात्कार

पोलिसांनी सांगितले की, नगीना देहाट येथे राहणारे रंगाचे व्यापारी राहतात. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते व त्यांची आई आणि दोन मुलांसोबत औषधे आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या चार ते पाच चोरट्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांच्या छतावरून घरात घुसले. घरात घुसताच त्यांनी उद्योजकाच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिच्या शरीराला सिगारेटचे चटके देऊन तिला बेशुद्ध करण्यात आले.

कटरने दरवाजा तोडून लूट

व्यापाऱ्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार करुन घरातील कपाटाचे कुलूप तोडून घरातील 25 तोळे सोन्याचे दागिने, 2 किलो चांदी, रोख दीड लाख रुपये, घरात लावलेला एलईडी, स्कूटरसह अन्य घरातील साहित्य असा ऐवज लंपास केला. यावेळी घरातील जे दरवाजे तोडता आले नाहीत, ते दरवाजे त्यांनी कटरने कापले आहेत.

ADVERTISEMENT

शरीराला सिगारेटचे चटके

दरोडेखोरांनी घरात घुसून महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला बेशुद्ध केले होते, त्यानंतर तिच्या शरीराला सिगारेटचे चटकेही देण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यास गेल्यानंतर मात्र पोलिसांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोपी पीडित कुटुंबाने केला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांवरही गंभीर आरोप

कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मात्र पोलीस अधीक्षकांनी सामहिक बलात्कार, दरोडा, सिगारेटने चटके देण्याचा गंभीर प्रकार केल्याचे सांगत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात हलगर्जीपणा का केला असा सवाल करुन या प्रकरणी तात्काळ खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> Crime News: …अन् माकडांच्या टोळक्याने मुलाचं पोट फाडलं, नेमकं घडलं काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT