Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
कास्टिंग डायरेक्टर असलेल्या आरोपीने तरुणीला मित्राच्या रुमवर नेले आणि बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT
-पारस दामा, मुंबई
ADVERTISEMENT
Mumbai crime news : सेक्स करण्यास नकार दिल्याने तरुणाने आपल्या फेसबुक फ्रेंडची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत ही घटना घडली आहे. 18 वर्षीय तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून 26 वर्षीय कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकरशी मैत्री झाली. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. दीपकने मुलीकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र तिने नकार दिल्याने दीपकने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने कळसच गाठला. (casting director trying to rape a girl)
ही संतापजनक घटना घडलीये मुंबईतील वर्सोवा भागात. दीपक मालाकरने फेसबुकच्या माध्यमातून 18 वर्षीय तरुणीशी मैत्री केली. 10 ऑगस्टच्या रात्री दोघांची भेट झाली. रात्री 10.30 च्या सुमारास दीपक त्याच्या एफबी मैत्रिणीला वर्सोवा येथील गोमा गली येथील नाखवा हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिला तिथे घेऊन जाण्यापूर्वी दीपकने पीडितेला सांगितले की,त्याचा मित्र इथे राहतो. त्याच्याकडून काही सामान घ्यायचे आहे. त्यामुळे पीडित मुलगी दीपकसोबत गेली.
हे वाचलं का?
वाचा >> Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू
भिंतीवर डोके आपटून खूनाचा प्रयत्न
फ्लॅटवर येताच दीपकने गेट बंद करून तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी करण्यास सुरुवात केली. मुलीने नकार दिल्याने दीपकने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता, दीपकने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर आरोपी तरुणाने मुलीचा चेहरा उशीने दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पीडित मुलगी बेशुद्ध पडली. दरम्यान, दीपकला वाटले की ती मेली आहे. त्यामुळे आरोपी तेथून पळून गेला.
वाचा >> Reshmi Nair: मॉडेलने हनुमान मंदिर परिसरातच केले न्यूड फोटोशूट
11 ऑगस्टला सकाळी मुलगी शुद्धीवर आल्यावर रडायला लागली. फ्लॅटजवळ राहणाऱ्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ जाऊन मुलीला फ्लॅटमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
ADVERTISEMENT
आरोपीला गुजरातमधून केली अटक
पोलिसांनी आरोपी दीपक मालाकर याचा शोध सुरू केला. आरोपीने त्याचा मोबाईल बंद केला होता. तीन दिवस सतत शोध घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, उशीने चेहरा दाबल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे त्याला वाटले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता.
ADVERTISEMENT
पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. त्याला मुलीला मारायचे होते. कारण मुलीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. दीपक जितेंद्र मालाकर असे आरोपीचे पूर्ण नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 307, 354, 354 (ए), 342, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT