Gogamedi Murder: घरात घुसून 12 गोळ्या झाडल्या, निर्घृण हत्येचा हादरवून टाकणारा Video

रोहित गोळे

ADVERTISEMENT

cctv footage of murder of sukhdev singh gogamedi surfaced killers were sitting together sudden rapid firing
cctv footage of murder of sukhdev singh gogamedi surfaced killers were sitting together sudden rapid firing
social share
google news

Gogamedi Murder CCTV Video: जयपूर: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता त्याच्या हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये हल्लेखोर हे आरामात बसून सुखदेव सिंग गोगामेडी यांच्याशी सुरुवातीला चर्चा करत होते.. यानंतर त्यांनी अचानक बेछूट गोळीबार केला आणि त्यांची जागीच हत्या केली. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. (cctv footage of murder of sukhdev singh gogamedi surfaced killers were sitting together sudden rapid firing)

ADVERTISEMENT

सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील श्याम नगर जनपथ येथील घरी हत्या करण्यात आली. सध्या या हत्याकांडाची जबाबदारी राजस्थानच्या रोहित गोदारा टोळीने घेतली आहे.

गोगामेडी यांना भेटण्यासाठी एकूण तीन जण आल्याची माहिती मिळाली आहे. आधी ते खोलीत गेले आणि तिथे बसून सुमारे 10 मिनिटे ते बोलत होते. यानंतर दोघांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये गोगामेडीसह नवीन शेखावत नावाचा कापड व्यापारी मारला गेला आहे. हल्लेखोर त्याच्यासोबतच गोगामेडी यांच्या घरी पोहोचले होते.

हे ही वाचा>> Dinesh Phadnis: CID फेम अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; चाहत्यांना मोठा धक्का!

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

या हत्याकांडाशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. पहिल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये सुखदेव सिंह गोगामेडी त्यांच्या घरातील सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. त्याच्या समोर तीन जण बसले होते. तिथे एक व्यक्ती उभी होती. संभाषण सुरू असताना अचानक समोर बसलेल्या दोघांनी पिस्तुल काढून गोळीबार केला.

ADVERTISEMENT

या हत्याकांडाशी संबंधित आणखी एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्या घरात ही हत्या झाली त्याच घराच्या बाहेरली हा सीसीटीव्ही व्हिडीओ आहे. आतून गोळीबार झाल्यानंतर बाहेर उभे असलेले रक्षक सावध झाल्याचे दिसले. पण मारेकरी बाहेर आल्याचं दिसताच त्यांनी तात्काळ पळ काढला. या व्हिडिओमध्ये कापड व्यापारीही गोळी लागल्याने जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांनी तिथून तात्काळ पळ काढला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Uddhav ठाकरेंची नवी खेळी, थेट अदाणींच्या ऑफिसवर का नेणार मोर्चा?

गोळीबार करणाऱ्या दोघांनी गोगामेडी तसेच तेथे उपस्थित असलेल्या इतर दोघांवरही गोळीबार केला होता. पण त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने गोगामेडी होते हे व्हिडीओ पाहून स्पष्ट होते. एकूण एक डझनहून अधिक गोळ्या यावेळी झाडण्यात आल्या, त्यापैकी बहुतांश गोगामेडी यांना लक्ष्य करण्यात आले.

रोहित गोदारा टोळीने घेतली जबाबदारी

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी रोहित गोदारा टोळीने घेतली आहे. ही टोळी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. रोहित गोदाराने काही महिन्यांपूर्वी दुबई नंबरवरून गोगामेडी यांना धमकी दिली होती. रोहित गोदरा हा कुख्यात गुंड असून तो सध्या भारतातून फरार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एनआयए त्याचा शोध घेत आहे.

गोदाराने लिहिले आहे, ‘सर्व भावांना राम राम. मी, रोहित गोदारा कपूरीसर, गोल्डी ब्रार, आज झालेल्या हत्येची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे. बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की तो आमच्या शत्रूंना सहकार्य करत होता. त्यांना बळ देण्याचे काम करत होता. जोपर्यंत आमच्या शत्रूंचा संबंध आहे, त्यांनी त्यांच्या घराच्या दारात त्यांची तिरडी तयार ठेवावी, आम्ही त्यांना लवकरच भेटू.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT