Nagpur Crime : 14 किलो सोने, 200 किलो चांदी अन् 17 कोटी रोख; पोलिसही चक्रावले!

योगेश पांडे

ADVERTISEMENT

An international cricket bookie based in Maharashtra's Gondia lured a businessman into investing in fake betting apps and then duped him of over Rs 58 crore.
An international cricket bookie based in Maharashtra's Gondia lured a businessman into investing in fake betting apps and then duped him of over Rs 58 crore.
social share
google news

Nagpur police Raid on cricket bookie house : नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे एका व्यावसायिकाची तक्रार आली. एका व्यक्तीने ऑनलाईन सट्ट्यात तब्बल 58 कोटी रुपये उडवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली गेली आणि क्रिकेट बुकीच्या घराचा ठिकाणा सापडला. त्यानंतर पोलिसांनी गोंदियातील त्याच्या घरी धाड टाकली. त्यावेळी घरात सापडलेली मालमत्ता बघून पोलिसही चक्रावून गेले. (The Nagpur police found cash worth more than Rs 17 crore, about 14 kg gold and 200 kg silver)

ADVERTISEMENT

हे प्रकरण आहे गोंदिया येथील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीने एका व्यावसायिकाला बनावट सट्टेबाजी अॅप्समध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 58 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या गोंदियातील काका चौकातील घरावर छापा टाकला तेव्हा पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला.

बुकी दुबईला गेला पळून

घरात पोलिसांना 17 कोटींहून अधिक रुपयांची रोकड, सुमारे 14 किलो सोने आणि 200 किलो चांदी सापडली, जी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वीच आरोपी घरातून पळून गेला.

हे वाचलं का?

वाचा >> PM नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतुक, अर्थ काय?

याबद्दल अधिक माहिती अशी की, ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म तयार करणारा कथित ‘बुकी’ अनंत उर्फ सोंटू नवरतन जैन हा नागपूरपासून 160 किमी अंतरावर असलेल्या गोंदिया शहरात राहतो. पोलिसांनी जैनच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो त्याच्या एक दिवस आधी दुबई फरार झालेला होता.

व्यावसायिकाला कसे अडकवले जाळ्यात

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दल सांगितलं की, “जैनने तक्रारदाराला म्हणजे संबंधित व्यावसायिकाला ऑनलाइन जुगारातून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली. नंतर व्यावसायिक जैनच्या जाळ्यात अडकला.”

ADVERTISEMENT

“त्यानंतर हवाला एजंटमार्फत 8 लाख रुपये हस्तांतरित केले. जैन यांनी व्यावसायिकाला व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जुगार खाते उघडण्यासाठी एक लिंक दिली. व्यावसायिकाने खात्यात 8 लाख रुपये जमा केले आणि जुगार खेळायला सुरुवात केली”, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

ADVERTISEMENT

वाचा >> Exclusive : ‘नग्न धिंड, बलात्कार अन्…’, माजी सैनिकाने सांगितली ‘त्या’ व्हिडिओची हादरवून टाकणारी गोष्ट

पोलीस आयुक्त म्हणाले की, सुरुवातीला पैसे मिळाल्यानंतर व्यावसायिकाला नंतर झटके बसू लागले कारण या जुगारात त्याने फक्त 5 कोटी रुपये जिंकले होते, परंतु 58 कोटी रुपये गमावले होते. व्यावसायिक प्रचंड तोट्यात गेला. त्यानंतर व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने त्याचे पैसे परत मागितले. परंतु जैनने नकार दिला.

आयुक्त म्हणाले, ‘व्यावसायिकाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जैन यांच्या गोंदिया येथील निवासस्थानावर पोलिसांनी छापा टाकला.

घरात सापडला मोठा ऐवज

या छाप्यात आरोपी बुकीच्या घरातून 17 कोटी रुपये रोख, 14 किलो सोने आणि 200 किलो चांदीचे सोन्याचे बिस्किटे आणि दागिने सापडले. मात्र, बुकी जैनने पोलिसांना चकमा दिला. तो दुबईला पळून गेल्याचा संशय आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत अद्याप निश्चित करणे बाकी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT