Live in Partner Pressure Cooker: दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय, प्रेशर कुकरने ठेचून लिव्ह-इन पार्टरनची हत्या

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Live In Partner Pressure Cooker crime news a guy living in a live in brutally killed his partner with a pressure cooker
Live In Partner Pressure Cooker crime news a guy living in a live in brutally killed his partner with a pressure cooker
social share
google news
Live In Partner Murder Pressure Cooker: बंगळुरू: देशात लिव्ह इन पार्टनरच्या (Live In Partner Murder) हत्येच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळुरूमध्ये (Banglore) घडला आहे. एका तरुणाने आपल्या लिव्ह-इन पार्टनरला प्रेशर कुकरने बेदम मारहाण केली. यात त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. हत्येचा आरोप असलेल्या तरुणाला त्याची प्रेयसी आपली फसवणूक करत असल्याचा संशय होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बेगुरच्या मायको लेआउटमध्ये ही घटना घडली. (Crime News A guy living in a live-in brutally killed his partner with a pressure cooker)

 

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील 24 वर्षीय देवा ही गेल्या दोन वर्षांपासून वैष्णवसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आरोपी वैष्णव हा केरळमधील कोल्लमचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकले होते आणि सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करत होते.

Chhagan Bhujbal: तेलगी प्रकरणात चार्जशीटमधील नाव खोडणारा अदृश्य हात कुणाचा?, जितेंद्र आव्हाडांच सूचक ट्वीट

मयत मुलीच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्यात अनेकदा भांडण व्हायचं. पण, दोघांपैकी कोणीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वैष्णवला त्याची लिव्ह इन पार्टनर देवावर संशय होता की तिचं दुसरीकडे अफेअर सुरू आहे. यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचं. रविवारी दोघे पुन्हा एकमेकांशी भांडू लागले, त्यानंतर वैष्णवने तिला प्रेशर कुकरने बेदम मारहाण केली. अतिरक्तस्रावामुळे तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Chandrayaan 3: प्रज्ञान रोव्हरच्या वाटेवर भला मोठा खड्डा, कसा मार्ग काढणार? इस्त्रोने दिली माहिती

दक्षिण बंगळुरूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सीके बाबा यांनी सांगितले की, आरोपीने मुलीला प्रेशर कुकरने मारहाण केली. घटनेनंतर वैष्णव फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी म्हणाले, ‘आम्ही त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.’

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT