नातेवाईकानंच घात केला! विश्वास ठेवून सोबत पाठवलं, पण नराधमानं मुलीवर अत्याचार करुन संपवलं
Pune Crime News: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गावातीलच एका 35 वर्षीय व्यक्तीने तिला त्याच्या दुचाकीवर नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासातून समोर आले की, संशयिताने मुलीला ट्यूशनला सोडण्याचे आमिष दाखवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात अल्पवयीन मुलीला अत्याचार करुन संपवलं

आरोपीच्या कारमध्ये बसून गेली होती तरूणी

नातेवाईक म्हणून कुटुंबानं ठेवला होता विश्वास
Pune News : पुणे जिल्ह्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 एप्रिल रोजी सकाळी पीडित मुलगी ट्यूशनसाठी घरातून निघाली, पण ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा >>पुण्यातील एकाला 2.5 कोटींचा गंडा; कनेक्शन थेट बीड, पाकिस्तान, दुबई नेपाळपर्यंत... प्रकरण काय?
पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली आणि मुलगी ट्यूशनला जाण्यासाठी वापरत असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. 12 एप्रिल रोजी गावातून वाहणाऱ्या नदीत तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि खून झाल्याचे उघड झाले. तिच्या शरीरावर जखमांचे निशाणही आढळले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गावातीलच एका 35 वर्षीय व्यक्तीने तिला त्याच्या दुचाकीवर नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासातून समोर आलं की, संशयिताने मुलीला ट्यूशनला सोडण्याचं सांगून सोबत नेलं होतं.
हे ही वाचा >>"100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय
मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना तो ओळखीचा असल्यानं मुलगी त्याच्यासोबत गेली. मात्र, त्याने तिला निर्मनुष्य ठिकाणी नेलं, तिथे तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर खून करून मृतदेह नदीत टाकला. तिची बॅग त्याने विहिरीत फेकली आणि तो पसार झाला.
पोलिसांनी संशयिताविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.