Dating app वर भेटलेल्या तरुणीला घरी आणलं अन् झाला ‘गेम’, रात्रीत काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

a girl who became a friend through a dating app has defrauded a young man of lakhs of rupees.
a girl who became a friend through a dating app has defrauded a young man of lakhs of rupees.
social share
google news

Dating crime news marathi : लव्ह, सेक्स अन् धोका असंच सध्याच्या पिढीमध्ये सुरू आहे. यातूनच सगळीकडे डेटिंगचे प्रकार वाढले आहेत. असे अनेक ॲप उपलब्ध असून, यातून काही धक्कादायक प्रकारही घडत आहेत. एका तरुणालाही डेटिंग ॲपवर भेटलेल्या तरुणीला घरी आणणं महागात पडलं. ही घटना गुरुग्राममध्ये घडली असून, तरुणाची या तरुणीशी बंबल ॲपवर भेट झाली होती. (A girl who met on the dating app Bumble, ran away with the gold, cash and iPhone 14)

ADVERTISEMENT

हरियाणातील गुरुग्राममध्ये एका तरुणाला बंबल या डेटिंग ॲपवर तरुणीशी मैत्री करणे महागात पडले. तरुणीने तरुणाला दारू पाजली आणि नंतर घरात ठेवलेले सोने, रोख रक्कम आणि आयफोन 14 घेऊन पळून गेली. घटनेनंतर दोन दिवसांनी तरुण शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा >> ललित पाटील ड्रग्ज प्रकरण! पुणे पोलिसांना गुंगारा देणारे आरोपी पाटील बंधू कोण?

गुरुग्राममधील डीएलएफ फेज 4 मध्ये ही घटना घडली. येथे राहणारा रोहित गुप्ता याने पोलिसांना सांगितले की, त्याची बंबल डेटिंग ॲपच्या माध्यमातून साक्षी उर्फ ​​पायल नावाच्या मुलीशी भेट झाली होती. मुलीने रोहितला सांगितले होते की ती दिल्लीची आहे आणि सध्या गुरुग्राममध्ये तिच्या मावशीकडे राहत आहे.

‘रस्त्यात दारू घेतली आणि मुलीला घरी आणले’

रोहित पुढे म्हणाला, 1 ऑक्टोबर रोजी साक्षीने मला फोन करून तिला भेटायचे असल्याचे सांगितले. रात्री 10 च्या सुमारास तिने मला गुरुग्राममधील सेक्टर 47 मधील डॉकयार्ड बारजवळ घेण्यासाठी बोलावले. मी तिथे पोहोचलो आणि साक्षीला घेऊन घरी येऊ लागलो. वाटेत जवळच्या दुकानात दारू घेतली आणि माझ्या घरी आलो.

हेही वाचा >> Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!

तरुणीने तरुणासोबत काय केले?

रोहितने सांगितले की, ‘घरी येताच साक्षीने त्याला किचनमध्ये ठेवलेल्या फ्रीजमधून बर्फ आणायला पाठवले. जेव्हा तो साक्षीपासून दूर गेला तेव्हा तिने कोल्ड्रिंकमध्ये नशीला पदार्थ मिसळला. नंतर दोघांनी मद्यपान केले. औषधाचा प्रभाव इतका जास्त होता की, मला दोन दिवसांनी म्हणजे 3 ऑक्टोबरच्या सकाळी जाग आली. तसेच साक्षी माझ्या घरातून बेपत्ता असल्याचे मला आढळले. माझी सोन्याची चेन, आयफोन 14 प्रो, 10,000 रुपये रोख, क्रेडिट आणि डेबिट कार्ड गायब होते.’

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘डेट’वर जाताय? तर ‘या’ चुका टाळाच, नाही तर आयुष्यभर राहाल ‘सिंगल’

‘बँक खात्यातून 1.78 लाख रुपयेही काढले’

रोहित गुप्ताने तक्रारीत म्हटले आहे की, ‘या घटनेनंतर मी घाबरलो. साक्षीशी संपर्क होऊ शकला नाही. मी माझे बँक खाते तपासले आणि माझ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून 1.78 लाख रुपये काढण्यात आल्याचे आढळले.’ साक्षी उर्फ ​​पायल नावाची मुलगी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. मंगळवारी गुरुग्राममधील सेक्टर 29 पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT