Crime News : बेडरुमध्ये सुनेला बघून संतापलेल्या सासूने गोळीच घातली, कारण…
उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये रागाच्या भरात सासूने सुनेला संपवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केलीये. यात मयत विवाहितेचा पती, सासऱ्यालाही अटक झालीये.
ADVERTISEMENT
घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतच असं आपण म्हणतो. अनेक घरात हे वाद असतात सासू-सूनेमध्ये. त्याची कारणं वेगळी असतात, पण या घटनेत सासूने सुनेला थेट गोळ्याच घातल्या. घटनेमागचं कारणही समोर आलंय आणि पोलिसांनी हत्या करणाऱ्या सासूसह सासऱ्याला आणि पतीलाही अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये. रागाच्या भरात सासूने सुनेला संपवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केलीये. यात मयत विवाहितेचा पती, सासऱ्यालाही अटक झालीये. तिघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंत सून अन्… आता प्रकरण समजून घ्या…
हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव कोमल आहे. कोमलचे लग्न औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजरौला येथे झाले होते. कोमलचे आईवडिल श्रीमंत आहे. वडिलांकडच्या श्रीमंतीमुळे कोमल लग्नानंतर सासरच्या घरात काम करत नव्हती, असा आरोप आहे.
हे वाचलं का?
दुसरीकडे कोमलची सासू हुंड्याची मागणी करत होती आणि त्यावरून वारंवार भांडणे होत होती, असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांचा आहे.
हेही वाचा >> PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?
दोन दिवसांपूर्वी मयत कोमलचा पती दुकानावर गेला होता. इतर लोक बाहेर गेले होते. यावेळी कोमल बेडरुमध्ये झोपून होती. कोमलची सासू बेडरूममध्ये गेली आणि तिने झोपलेल्या सुनेच्या डोक्यात गोळी झाडली, त्यात कोमलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सासूने पिस्तूल घराबाहेरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकले.
ADVERTISEMENT
घरात लूट झाल्याचा कट
कोमलची गोळी घालून हत्या केल्यानंतर आरोपी सासूने तिच्या मुलाला (कोमलच्या पतीला) फोन करून सांगितले की, घरात चोर घुसले आणि त्यांनी लुटले. त्यांनीच मारले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?
दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असता महिलेच्या डोक्याला गोळी लागल्याचे निशाण असल्याचे आढळून आले. पोस्टमॉर्टममध्ये कोमलच्या सासूने घराबाहेर काहीतरी फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले. तपासानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सासूसह पतीला अटक करून कोठडीत पाठवले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT