RK Puram Murder : क्लार्कने बॉसला घरी बोलवले अन् केले तुकडे; भयंकर हत्याकांड
दिल्लीतील गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होत नाही. नुकताच एक प्रकरणाचा तपास उघड झाला आहे. त्यामध्ये क्लार्कने आपल्या बॉसला घरी बोलवून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला कारण विचारले असता माझ्या गर्लफ्रेंडकडे माझा बॉस वाईट नजरेने बघत होता म्हणून त्यांना संपवूनच टाकले असं सांगितले.
ADVERTISEMENT
Murder Case: देशाच्या राजधानीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.काही दिवसांपूर्वी दिल्लीतील (Delhi) आरकेपुरम परिसरात सर्व्हे ऑफ इंडिया डिफेन्सच्या अधिकाऱ्याची (Survey of India Defense officer) हत्या करण्यात आली होती. अधिकाऱ्याची हत्या (Officer murder) ही त्यांच्याच कार्यालयातील एका क्लार्कने केली होती. त्या क्लार्कने अधिकाऱ्याची हत्या केली ती केली आणि मृतदेहही सरकारी फ्लॅटसमोरच पुरण्यात आला. मृतदेह मातीत गाडून त्यावर सिमेंट आणि फरशीचे बांधकामही केले होते. या घटनेचा त्याच्याकडून खुलासा करण्यात आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
अन् अधिकारी बेपत्ता झाले
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिकारी महेश हे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. महेश हे मुळचे हरियाणातील झज्जर येथील राहणार होते. मात्र महेश जिथे राहत होते, त्याच पोलीस स्थानकात ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्या तक्ररीमध्ये म्हटले होते की, माझा मोठा भाऊ महेशने त्याचा सहकारी अनीसकडे भेटायला जात असल्याचे त्याने आपल्या मेहुण्याला सांगितले होते. तेव्हापासूनच तो बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अनीसकडेही तक्रार करण्यात आली मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले होते असंही त्यांनी सांगितले होते.
हत्या करणारच शोधासाठी पुढे
तक्रार देऊनही महेश यांच्याबाबत कोणताही सुगावा लागला नव्हता. त्यानंतर एक पथक तयार करुन तपास सुरु केला. त्यावेळी महेश यांचे शेवटचे लोकेशन हे हरियाणातील फरिदाबादमध्ये सापडले. मात्र तिथेही कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे महेश यांचा सहकारी अनीस याच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मात्र आपणच महेश यांची हत्या केल्याचे कबूल केले. महेश यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर अनीसनेही आपण त्यासाठी मदत करु असा शब्द दिला होता. मात्र त्यानंतर त्यानेच हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर त्याने सगळा घटनाक्रम सांगितला.
हे वाचलं का?
मैत्रिणीवर वाईट नजर
अनीस सांगतो की महेश कुमारे हे माझ्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहत होते. तसेच ते 9 लाख रुपयही देत नव्हते. त्यामुळे त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी कार्यालयातून सुटी घेऊन मारण्याची सगळी तयारी केली. फावडे आणि रॉड विकत घेऊन त्याने अधिकारी महेश यांना त्याने घरी बोलवले. घरी आल्यानंतर त्याने फावडे आणि रॉडने हल्ला करुन महेश यांची हत्या केली.
हत्या करुन फोन घरी ठेवला
महेश यांची हत्या करुन त्याने त्यांचा फोन त्यांच्या घरी ठेवला. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी सरकारी घराजवळच खड्डा काढून त्यामध्ये महेश यांचा मृतदेह पुरुन त्यावर सिमेंटने बांधकाम करुन त्यावर पक्की फरशी घालून पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करुन त्यांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT