OYO रूममध्ये प्रियकरासोबत पोहोचली विवाहित प्रेयसी, चेकआऊटवेळी दोघंही आढळले भयानक अवस्थेत!
राजधानी दिल्लीतील जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे नावाच्या हॉटेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून तिची हत्या केली.
ADVERTISEMENT
Delhi Crime News : राजधानी दिल्लीतील (Delhi) जाफराबाद पोलीस (Jafrabad Police) स्टेशन हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे नावाच्या हॉटेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर प्रियकरानेही पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Delhi Crime Married girlfriend reaches OYO room with boyfriend they both found in terrible condition)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळील ओयो किंग स्टे हॉटेलमध्ये एक कपल चेकआउटच्या वेळी खोलीतून बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर खोलीचा दरवाजा उघडला असता, दोघोजण मृतावस्थेत आढळून आले.
वाचा : मायबापाच्या शोधात स्वित्झर्लंडहून मुंबईला आली, पण नंतर जे कळलं त्यामुळे धक्काच बसला!
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत 27 वर्षीय आयेशाचा मृतदेह बेडवर पडला होता, तर तिचा प्रियकर सोहराबचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेला होता. प्रियकराने आधी प्रेयसीचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे.
कपलने 4 तासांसाठी रूम बुक केली होती
दुपारी एकच्या सुमारास हे कपल हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेल कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याने 4 तास खोली बुक केली होती, मात्र रात्री 8 वाजेपर्यंत हे कपल रुममधून बाहेर न आल्याने स्टाफने रुमचा दरवाजा ठोठावला. आतून आवाज न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ जाफराबाद पोलीस ठाण्यात माहिती दिली.
वाचा : NCP : ‘…तर जयंत पाटलांनी महायुतीत शपथ घेतली असती’, अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट
जाफराबाद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटवर लिहिले होते, ‘आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जीटीबी रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.’
ADVERTISEMENT
वाचा : Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ भाजपने पुन्हा टाकला, कारण आलं समोर
घटनेबाबत डीसीपी काय म्हणाले?
उत्तर पूर्व दिल्लीचे डीसीपी डॉ. जॉय टिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कपलची ओळख पटली आहे. मृत 28 वर्षीय सोहराब हा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी होता, तर मृत 27 वर्षीय आयशा ही आधीच विवाहित होती आणि तिला दोन मुले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दोघे किती दिवसांपासून प्रेमसंबंधात होते हे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत महिलेचा पती व्यावसायिक आहे. दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT