Pradeep Kurulkar : हनीट्रॅपमध्ये अडकलेले कुरूळकर RSS च्या शाखेत जायचे का?
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुळकरांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपांनंतर न्यायालायने त्यांना 9 मे पर्यंत ATS च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुळकर यांना महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून 5 मेला अटक केली. पाकिस्तानला व्हाट्सअॅ्पवरून कॉल आणि मॅसेजवरून गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुळकरांनी गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपांनंतर न्यायालायने त्यांना 9 मे पर्यंत ATS च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान कुरुळकर पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. डॉ. कुरुळकर यांच्यावर काय आरोप आहेत, आणि त्यांना का अटक केली आहे?
ADVERTISEMENT
संरक्षण संशोधन संस्थेच्या म्हणजेच DRDO च्या संचालक पदावर काम करत असलेले डॉ. प्रदीप कुरुळकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुळकर यांना हनी ट्रॅप अडकवलं होतं. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आला. त्या वेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आलं होतं. चौकशीत कुरुळकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाइल राज्य दहशतवाद विरोधी पथकातील अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे सोपविण्यात आला. कुरुळकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले, तसेच ते कोणाच्या संपर्कात होते, याचा तपास करण्यात येतोय.
drdo scientist : असं घडलं कुरुळकर प्रकरण
कुरुळकर हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयावरुन दहशतवादी विरोधी पथकाने संचालकांवर कारवाई केली आणि त्यांना 5 मेला अटक केलं.
डॉ. कुरुळकरांनी DRDO च्या पुणे येथील कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह च्या हस्तकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरुन व्हॉईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात केल्याची माहिती ATS ला मिळाली होती. त्यासोबत डि. आर. डी. ओ. चे शास्त्रज्ञ पदाचा गैरवापर करत त्यांच्या ताब्यात असलेली संवेदनशील शासकिय माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे.
हेही वाचा >> DRDO: पाक ललनेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेला प्रदीप कुरूळकर आहे तरी कोण?
कुरुळकरांच्या गॅझेटचं टेक्निकल analysis करण्यात आलंय. रॉनेही चौकशी सुरू केली आहे. कुरुलकर पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटल्याचा संशय आहे. करुळकरांनी गुप्तहेरांना नेमकी काय माहिती दिली? ते हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले याबाबतची माहिती सध्या तपास यंत्रणा घेताहेत.
ADVERTISEMENT
कुरुळकर संघाच्या शाखेत जायचे?
डॉ. कुरुळकर हे शनिवार पेठेत रहायचे. पेरुगेट भावे हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्रशालेत शिक्षण झालंय. शनिवार पेठेत त्यांची जडणघडण झाली. स. प. महविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.
ADVERTISEMENT
डॉ. कुरुळकर यांना अटक झाल्यानंतर चर्चा सुरू आहे ती कुरुळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची. ही चर्चा सुरू झाल्यानंतर RSS च्या सहयोगी संघटनांनी कुरुळकर संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे महानगर संचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी कुरुळकर संघाशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. वंजारवाडकर यांनी लोकसत्ताला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> सुषमा अंधारेंच्या अश्रुंचा फुटला बांध! शरद पवारांकडे केली अजित पवारांची तक्रार
पुण्यासारख्या शहरातील सुशिक्षित तरुण – तरुणी विविध प्रकारच्या चांगल्या कार्यात जोडले जातात. मात्र, डॉ. प्रदीप कुरुळकर संघ विचारांशी संबंधित होते की नाही याची माहिती नाही. शासकीय सेवेत नोकरी करणाऱ्यांना नियमानुसार संस्था संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेता येत नाही.
स्वतः कुरुळकर यांनी मित्ररंग या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संघाशी संबंधित असल्याची माहीत दिली होती. याबद्दल त्यांचा दहा महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीचे दोन भाग आणि चार महिन्यांपूर्वी एक भाग प्रकाशित झाले आहेत.
कुरुळकरांच्या तीन पिढ्या आरएसएसमध्ये…
या मुलाखतीनुसार डॉ. कुरुळकरांच्या तीन पिढ्या संघाशी संबंधित आहेत. वयाच्या पाचव्या वर्षांपासून कुरुळकर संघ शाखेत जात होते. “संघघोष शिकणारे सुब्बू श्रीनिवास याचा हात धरुन मी मोतीबागेत प्रवेश केला. संघ शाखा संध्याकाळच्या माझ्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग होता” असं कुरुळकरांनी यांत सांगितलं आहे.
कुरुळकरांचे आजोबा प्रभात शाखेत जात होते आणि शाखेची गंगाजळी सांभाळणे, टिपणं ठेवणे अशी काम त्यांचे आजोबा करायचे. त्यानंतर तेच काम कुरुळकरांच्या वडिलांकडे आलं. लोकसत्ता वर्तमान पत्राने दिलेल्या माहितीनसार कुरुळकर संघाच्या ‘घोष पथकामध्ये’ 14 वर्षे सॅक्सोफोन वाजवायचे. संघाच्या स्वयंसेवकांवर संस्कार करणाऱ्या संस्थेमध्येही ते काम करायचे.
हेही वाचा >> Thackeray vs Shinde : ‘सुप्रीम’ निकाल कुणाच्या बाजूने? या आहेत 4 शक्यता
लोकसत्ताला एक संघ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार कुरुळकर पूर्वी संघाशी संबंधित होते मात्र त्यांच्याकडे कोणतंही पद किंवा जबाबदारी नव्हती. कुरुळकर काही वर्षांपूर्वी संस्कार भारतीमध्ये कार्यरत होते. मात्र गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा संघटनेशी कोणताही संबंध नाही असे संस्कार भारतीचे महामंत्री सतिश कुलकर्णी यांनी लोकसत्ताला सांगितलंय. आता कुरुळकरांच्या गॅझेटच्या आधारे काय नवीन माहिती समोर येणार हा महत्त्वाच्या मुद्दा आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT