Crime : चिमुकल्याचा घोटला गळा अन् बेडमध्ये लपवला मृतदेह, काकाने पुतण्याला का संपवलं?
भगत सिंह कॉलनी परीसरात भानू यांचे कुटुंब राहते. भानू यांना शिवांश नावाचा 6 वर्षाचा मुलगा आहे. हा मुलगा त्याच्या शेजाऱ्याच्या घरी नेहमी खेळायला जायचा. घटनेच्या दिवशी शिवांश त्याच्या शेजारच्या काकांची घरी खेळायला गेला होता.
ADVERTISEMENT
Faridabad Crime Story : लहान मुले कुणाच्याही घरी खेळायला जातात. असाच घरी खेळायला आलेल्या एका चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 6 वर्षीय शिवांश ऊर्फ छोटू असे या मृत चिमुरड्याचे नाव आहे. हा चिमुकला त्याच्या शेजारी राहणाऱ्या काकाची घरी खेळायला गेला होता. यावेळी काकाने गळा आवळून त्याची हत्या केली होती.यानंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. या घटनेचा आता उलगडा झाला आहे. तसेच हत्येमागचं कारण एकूण पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. (faridabad crime man killed 6 year old child to trap her wife in murder case)
ADVERTISEMENT
फरीदाबामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत एनआयटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भगत सिंह कॉलनी परीसरात भानू यांचे कुटुंब राहते. भानू यांना शिवांश नावाचा 6 वर्षाचा मुलगा आहे. हा मुलगा त्याच्या शेजारी राहणाऱ्या काकाच्या घरी नेहमी खेळायला जायचा. घटनेच्या दिवशी शिवांश त्याच्या शेजारच्या काकांची घरी खेळायला गेला होता.
हे ही वाचा : Ratnagiri : ऐकावं ते नवलंच! व्हेल माशाच्या पिलाचा मानसिक तणावामुळे मृत्यू
या दरम्यान काकाने डाव साधत शिवांशचा गळा आवळून त्याची हत्या केली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. बराच वेळ घराबाहेर गेलेला शिवांश घरी परतला नसल्याने त्याचे वडील भानू यांना काळजी वाटू लागली. आणि त्यांनी घराबाहेर पडून शिवांशचा शोध सुरु केला. मात्र शिवांश त्यांना कुठेच सापडला नाही, त्यामुळे त्यांनी पोलीस ठाणे गाठत अपहरणाची तक्रार दाखल केली.
हे वाचलं का?
भानू यांनी पोलिसात तक्रार करून भावावर संशय व्यक्त केला होता. कारण मंगळवारी संध्याकाळी शिवांश त्यांच्या घरी खेळायला गेला होता. यावेळी आरोपीने शिवांशचा गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवला होता. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर झाडाझडती घेतली असता घटनेचा उलगडा झाला.
हे ही वाचा : Manoj Jarange : ‘…मग अजितदादा अन् देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो?’, जरांगेंचा भुजबळांना सवाल
चिमुकल्याच्या काका बलरामने त्याची हत्या केली होती. यावेळी पोलिसांनी बलरामची चौकशी केली असता, त्याने हत्येमागे पोलिसांना हादरवून टाकणार कारण सांगितल. बलराम हा दिल्लीत मजूरीचं काम करतो. त्याला स्वत:ला तीन मुले आहेत. तसेच आरोपीचा बायकोसोबत वाद सूरू होता. या वादातूनच आरोपीने चिमुकल्याचा हत्येचा कट रचला होता. आणि या हत्येत बायकोला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या घटनेच त्याचं पितळ उघड पडलं.आरोपीने दिलेले हे हत्येमागचं कारण एकून पोलिसांना देखील धक्का बसला . या प्रकरणी आता बलराम विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT